Navratri 2026: नवरात्रीच्या उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक राजगिरा लाडू! नोट करा कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या उपवासात कायमच विकतचे वेफर्स किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवलेले राजगिऱ्याचे लाडू खावेत. हे लाडू चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा गुणकारी ठरतात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
नवरात्रीच्या उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक राजगिरा लाडू! नोट करा कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी
नवरात्रीच्या उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक राजगिरा लाडू! नोट करा कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी
Published on: 
Updated on: 

Navratri 2026: ११ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नऊ दिवसांच्या उत्सवातील प्रत्येक दिवस अतिशय आंनदाचा असतो. नऊ दिवस देवीला नऊ वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. नवरात्रोत्सव हा सगळ्यांसाठी अतिशय खास असतो. अनेक ठिकाणी गरबा, दांडियाचे आयोजन केले जाते. देवीची घटस्थापना केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी घटाचे विसर्जन केले जाते. दरवर्षी नवरात्री उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तर महिलांसह पुरुष सुद्धा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करतात. उपवास केल्यानंतर सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर केळीचे किंवा बटाट्याचे वेफर्स खाल्ले जातात. पण त्याऐवजी राजगिऱ्याच्या लाडूचे सेवन करावे. राजगिराचा लाडू चवीसोबतच शरीरासाठी अतिशय उत्तम मानला जातो. राजगिऱ्यामध्ये असलेले कॅल्शियम आरोग्य सुधारण्यास मदत करते. चला तर जाणून घेऊया राजगिऱ्याचा लाडू बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

साहित्य:

  • भाजलेले राजगिरा लाह्या
  • गूळ
  • साजूक तूप
  • वेलची पावडर
  • काजू-बदामाचे तुकडे

कृती:

  • राजगिऱ्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये २ चमचे तूप घालून गरम करून घ्या. गरम तुपात किसून घेतलेला गूळ घाला आणि पाक तयार होईपर्यंत चमच्याने सतत मिक्स करत राहा.
  • पाक तयार झाल्यानंतर गॅस बंद करून लगेच वेलची पावडर, काजू बदामाचे तुकडे घालून मिक्स करा आणि तयार केलेल्या मिश्रणात भाजलेला राजगिरा घालून मिक्स कर.
  • राजगिऱ्याचे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हातांना तूप किंवा हलकेसे पाणी लावून तुमच्या आवडीनुसार लाडू बनवून घ्या.
  • तयार आहेत झटपट तयार होणारे राजगिऱ्याचे लाडू. हा लाडू केवळ उपवासाच्या दिवशीच नाहीतर इतर वेळी भूक लागल्यानंतर सुद्धा खाऊ शकता.