
अनेक जोडप्यांना पोलिस पकडतील या भितीने बाहेर जाता येत नाही किवा जात नाही. आपण अनेकदा पोलिसांच्या कारवाईत पोलिसांनी जोडप्यांना पकडले अशा बातम्या देखील आपण पाहतो आणि बघतो. तसेच हॉटेलमधील या जोडप्यांचा मुक्काम कसा बेकादेशीर होता हे पोलीस पटवून देतात.
आता तुम्हाला माहितीये का? की, हॉटेलमध्ये अविवाहित जोडपे, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड रूम घेऊन बिनधास्त राहू शकतात. अशाप्रकारे राहणे हा गुन्हाही मानला जात नाही. परंतु, माहितीच्या अभावामुळे अनेकजण अशाप्रकारे राहणे गुन्हा असल्याचे मानतात. तुम्हाला गर्लफ्रेंडसोत हॉटेलमध्ये राहण्याचा नेमका कायदा काय आहे याबद्दल जाणून घ्या.