(फोटो सौजन्य: Pinterest)
पाठीचा कणा ठेवते सरळ
चुकीच्या आकाराची उशी तुमच्या मानेचं किंवा डोक्याचं हाडं बिघडवू शकते. यामुळे सकाळी डोकेदुखी होणे किंवा थकवा जाणवणे अशा समस्या उद्भवू लागतात. योग्य आधार असलेल्या उशीचा वापर केल्यास ती पाठीला सरळ रेषेत ठवते.
ॲलर्जीचा त्रास
तुम्ही नियमितपणे तुमच्या घरातील उशी स्वच्छ करत असाल पण तरीही त्यावर काही प्रमाणात धूळ, मृत त्वचा आणि घाम साचलेला असतो. यामुळे दमा, छातीत वेदना होणे आणि डोळ्यांमध्ये जळजळ निर्माण होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
झोपेसाठी मदत
तुम्ही जर वेळोवेळी उशी बदलली आणि चांगली उशी खरेदी केली तर त्याचा तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. योग्य आधार देणारी उशी निवडल्याने तुम्हाला अधिक आरामदायी झोप लागण्यास आणि झोपेत कुशी बदलण्यापासून रोखण्यास मदत होते.
आई-बाबा बनण्यात अडचण? इनफर्टिलिटीवर मात करण्यासाठी ही 6 ‘कपल योगासने’ ठरतील रामबाण उपाय
साधारण प्रत्येक उशीला दर दोन ते तीन वर्षांनी बदलले पाहिजे. बऱ्याचदा उशीच्या मटेरियलवर आणि काळजीवर अवलंबून असते. मटेरियलनुसार, उशीचे आयुष्यमान खालीलप्रमाणे असते:
पॉलिस्टर किंवा फायबरफिल: या उशा लवकर खराब होण्याची शक्यता असते. या उशा तुमच्या घरात असल्यास दर १२-१८ महिन्यांनी त्यांना बदलणे उत्तम ठरेल. जास्त काळ यांचा वापर केल्याने आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.
मेमरी फोम: या उशा दिर्घकाळ चांगल्या टिकून राहू शकतात. ज्यामुळे ३-४ वर्षे तुम्ही आरामात यांचा वापर करु शकता.
लेटेक्स: ही उशी सर्वात टिकाऊ मानली जाते. ती ३-४ वर्षांनंतरही खराब होत नाही. पण उशीची वेळोवेळी स्वच्छता करणेही गरजेचे आहे हे लक्षात ठेवा.
हे देखील लक्षात ठेवा की, सर्व उशा या धुण्यायोग्य नसतात. बहुतेक उशा या धुण्याच्या पर्यायासह येतात पण मेमरी फोम आणि लेटेक्सच्या उशा सहसा पूर्णपणे धुण्यासाठी नाही तर फक्त डाग काढण्यासाठीच असतात.






