आज जागतिक पर्यटन दिवस म्हणजे देशविदेशातील पर्यटनास चालना देण्यासाठी तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात पर्यटनाचं महत्व पटवून देण्यासाठी जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरीक परदेशात पर्यटनास जातात. तसेच परदेशी नागरिकही संस्कृती परंपरेचा वारसा टिकवलेल्या भारतात पर्यटनास येतात. जगातील 7 आश्चर्यांपैकी (7 Wonders in World) एक आश्चर्य भारतात आहे. परदेशी पर्यटक आगमनाच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तरी आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातल्या असेच काही ट्रॅव्हल डेस्टीनेशन सांगणार आहोत जे परदेशी नागरिकांनाही भुरळ घालतात.
कोकणाला महाराष्ट्राचा स्वर्ग असं म्हणटलं तर ते वावग ठरणार नाही कारण कोकणाचं सौदर्य अतुल्य आहे. कोकणात गणपतीपूळे, तारकार्ली, काशिद, दिवेआगर,दापोली, अलिबाग, गुहागर अशी काही स्वच्छ आणि निसर्गरम्य किनारे आहेत जिथे तुम्ही शांतता आणि सौदर्य अनुभवू शकता.
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. पर्यटनासाठी येथे गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, जूहू बीच अशी बरीच ठिकाण सली तरी पर्यटक येथे मुंबईसह मुंबईतील लोकांची दिनचर्या, मुंबईची जिवनवाहीन लोकल बघायला येतात. तरी मुंबई हे परदेशी पर्यटकांचं विशेष आकर्षण आहे
इतिहासकालीन महाराष्ट्रा बघायचा असेल तर पश्चिम महाराष्ट्र त्याची खूलून ग्वाही देतो.कोल्हापूरचा पन्हाळा, महाबळेश्वर, कासप्लाटू, सातारा, सांगली असं देखणं वैभ महाराष्ट्राला लाभलं आहे.
औरंगाबाद ही राज्याची पर्यटन राजधानी आहे. परदेशातून महाराष्ट्रात येणारे पर्यटक सर्वाधिक या शहरात हजेरी लावतात. कारण येथे अमुल्य अशा अजिंठा वेरुळ लेणी आहे. एवढचं नाही तर एक मिनी ताज महाल महाराष्ट्राकडेही आहे. औरंगाबादेतील बिबी का मकबरा हा अगदीचं ताजची प्रतिकृती आहे.
ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे देशातील मोठ्या राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे. सर्वाधित वाघांची संख्या असलेले हे राज्यातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. तरी खास वाघ बघायला येण्यासाठी या राष्ट्रीय उद्यानात पर्यटक हजेरी लावतात.