Acidic fruits
अनेक लोक चांगल्या आरोग्यासाठी फळांचे (fruits) सेवन वाढवतात, लिंबू पाणी पितात किंवा ताज्या फळांचा रस पितात. या पदार्थांमधून शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वे मिळतात, परंतु काही पदार्थांमधील आम्ल दातांच्या संरक्षक थराला नुकसान पोहोचवू शकते. दातांच्या या बाहेरील थराला इनॅमल म्हणतात. दातांचे संरक्षण करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. जेव्हा अॅसिडच्या संपर्कामुळे इनॅमल कमकुवत होते, तेव्हा दात गरम, थंड किंवा गोड पदार्थांप्रति संवेदनशील होऊ शकतात. जर हे दीर्घकाळ चालू राहिले, तर दातांच्या मजबुतीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणती फळे खाताना काळजी घेतली पाहिजे, जाणून घेऊयात. (Acidic fruits cause tooth enamel erosion)
Dental Health: रोजच्या ‘या’ सवयींमुळे दात होतात खराब; वेळीच टाळा, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान
अन्नातील अॅसिडचे प्रमाण त्याच्या PH मूल्यावरून मोजले जाते. युनायटेड स्टेट्स एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सी (EPA) नुसार, ज्या पदार्थांचा PH 7 पेक्षा जास्त असतो ते अल्कलाइन मानले जातात, तर ज्यांचा pH 7 पेक्षा कमी असतो ते अॅसिडिक असतात. PH जितका कमी, तितकी आम्लतेची पातळी जास्त.
व्हिटॅमिन सी शरीरासाठी अत्यावश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा आजार होऊ शकतो, ज्यामध्ये हिरड्यांमधून रक्त येते. त्यामुळे, लिंबूवर्गीय फळे खाणे टाळण्याऐवजी, त्यांचे मर्यादित प्रमाणात सेवन करा.






