बुध हा ग्रह व्यवसाय, बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र आणि संवाद कारक आहे. बुधाच्या अस्तामुळे ३ राशींच्या लोकांच्या लोकांचा समस्या वाढतील. या राशीतील लोकांना नुकसानाला सामोरे जावे लागेल.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह राशीचक्र वेगवेगळे चिन्ह बदलतात. त्याचप्रमाणे ग्रह उगवतात आणि मावळतातसुद्धा. ग्रहांच्या बदलांचा १२ राशींवर त्याचा प्रभाव पडतो. २ जून रोजी सूर्यास्त मोठे बदल घडवून आणेल. बुध वृषभ राशीत अस्त करेल त्यानंतर २९ जूनला गोचर करेल. बुध ग्रहाच्या बदलामुळे ३ राशीच्या लोकांना त्रास होण्याची शक्यता आहे. या लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकते आणि करिअरमध्ये अडचणीचा सामना करावा लागेल. त्याचबरोबर अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
२ जूनपासून या लोकांनी सावधान राहावे
तूळ रास
तूळ राशींच्या लोकांनी बुधाच्या अस्तामुळे अडचणींना सामोरे जावे लागेल. या लोकांना काही संर्सगासारखे रोग असू शकतात. वाहने सावकाश चालवा. शत्रू त्रास देण्याची शक्यता आहे त्यामुळे सावधान राहा. अनावश्यक खर्च करू नका. तुमचे बजेट असेल तेवढाच खर्च करा अन्यथा तुम्हाला कर्ज काढावे लागू शकते.
वृश्चिक रास
बुधाच्या अस्तामुळे वृश्चिक राशींतील लोकांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. या लोकांना नशिबाची साथ मिळत नाही. चालू असलेले कामसुद्धा बिघडू किंवा थांबू शकते. तुमच्या कामात अडचणी येऊ शकतात. चांगले काम करा जेणेकरून तुमच्या करिअरमध्ये अडचणी येणार नाही. जोडीदाराशी वाद न घालता त्याच्या तब्येतीची काळजी घ्या. तणाव टाळा.
मीन रास
मीन राशींच्या लोकांवर बुध ग्रहांचे वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. या लोकांच्या आरोग्यावरसुद्धा परिणाम होऊ शकतो त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच वाहन जपून चालवावे लागेल अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. शनिची साडेसाती सुरू आहे जी तुम्हाला त्रास देऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होऊ शकतात. तुमचा वेळ घ्या. नोकरी किंवा व्यवसायात बदल करण्यासाठी काळ चांगला नाही.
(टीप – ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)