Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्येष्ठांमधील न्यूमोनिया: लक्षणे, कारणे आणि उपचार, तज्ज्ञांनी केला खुलासा

Pneumonia: न्यूमोनिया हा आजार तसं तर गंभीर आहे. हा जीवघेणा संसर्ग असून यामुळे अनेक त्रास होऊ शकतात. याचे लक्षण, कारणं आणि उपाय नक्की काय आहेत याबाबत तज्ज्ञांकडून अधिक माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 25, 2024 | 05:47 PM
न्यूमोनियाची कारणे, लक्षणे, उपाय

न्यूमोनियाची कारणे, लक्षणे, उपाय

Follow Us
Close
Follow Us:

‘न्यूमोनिया’ हा श्वसनमार्गाचा आजार आहे. हा एक जीवघेणा संसर्ग असून यामध्ये तुमच्या फुफ्फुसातील पेशींना सूज यते. फुफ्फुसात हवेच्या अत्यंत छोट्या-छोट्या पिशव्या (Air sacs) असतात. यांना ‘अल्वेओली’ असं म्हटलं जातं. यामध्ये जंतूसंसर्ग झाल्यामुळे न्यूमोनिया होतो. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणालाही ‘न्यूमोनिया’चा त्रास होऊ शकतो. डॉ. समीर गर्दे, डायरेक्टर ऑफ पल्मोनोलॉजी आणि फुफ्फुस प्रत्यारोपण विभाग, ग्लेनईगल्स हॉस्पिटल, परळ यांच्याकडून अधिक माहिती घ्या. 

ज्येष्ठांच्या शरीराची प्रतिकारशक्ती फारशी चांगली नसते. त्यामुळे औषधे दिली तरी फारसा परिणाम होत नाही. शरीर रोगाशी लढण्यास तितकंसं सक्षम राहत नाही, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती उपचारांना योग्य प्रतिसाद देऊ शकत नसल्याने तब्येत आणखी बिघडते आणि रोगही वाढतो. ज्येष्ठांमध्ये प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे न्यूमोनिया होतो. अशावेळी फुफ्फुसावर परिणाम होऊन त्यांची मारक क्षमता वाढते. छातीत दुखणे आणि खूप ताप यासारखी वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांसह वयस्कर रूग्णांमध्ये गोंधळ उडणे किंवा हालचाल अचानक कमी होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात आणि त्यांना अचानक रुग्णालयामध्ये दाखल करण्याची आवश्यकता देखील भासू शकते.

कारणे कोणती?

वृद्ध लोकांमध्ये न्यूमोनिया अनेक अंतर्निहित घटकांमुळे उद्भवते जसे की वाढत्या वयामुळे  कमकुवत झालेली रोगप्रतिकारक शक्ती, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), मधुमेह किंवा हृदयरोग, जीवनशैलीचे घटक जसे की आहाराच्या चूकीच्या सवयी किंवा शारीरिक हालचालींच्या अभावामुळे फुफ्फुसाचे कार्य कमकुवत होऊ शकते आणि लवकर बरे होण्याची क्षमता कमी होते.

लक्षणे कोणती?

खोकला, ताप आणि थंडी वाजून येणे, छातीत दुखणे, थकवा येणे, धाप लागणे आणि जलद श्वास घेणे. यामुळे दैनंदिन कामे सहजतेने करण्याच्या क्षमतेत व्यत्यय येऊ शकतो. वृद्ध लोकांमध्ये गोंधळ उडणे, श्वास घेताना दम लागणे, शरीराचे तापमान वाढणे आणि छातीत असह्य वेदना होणे यासारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

निदान काय आहे?

निदान करण्यासाठी रक्त चाचण्या, सीटी स्कॅन आणि एक्स-रे च्या मदतीने याचे निदान केले जाऊ शकते. आयुष्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

उपचार:

उपचारांमध्ये अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरल औषधे आणि सपोर्टीव्ह केअर जसे की योग्य हायड्रेशन सुनिश्चित करणे, spo2 पातळी सारख्या महत्वाच्या गोष्टींचे निरीक्षण करणे, पुरेशी विश्रांती घेणे यांचा समावेश आहे. वेळेवर उपचार केल्यास श्वसनक्रिया बंद पडणे, फुफ्फुसासंबंधीत सिस्ट, सेप्सिस, फुफ्फुसात द्रव साचणे आणि मृत्यू ओढावण्यासारख्या गुंतागुंत टाळण्यास मदत होईल.

वृद्धांमध्ये न्यूमोनिया टाळण्यासाठी टिप्स

न्यूमोकोकल आणि इन्फ्लूएंझा लस घेणे, हातांची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, मास्कचा वापर करणे, वारंवार स्पर्श केलेल्या पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करणे, गर्दीच्या ठिकाणे फिरणे टाळा किंवा आजारी व्यक्तींशी संपर्क टाळा, धूम्रपान टाळा, संतुलित आहाराचे सेवन करा. न्युमोनियापासून बचाव करण्यासाठी दररोज व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या आणि फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी शरीरहायड्रेटेड राखा.

न्यूमोनिया हा वयोवृध्दांसाठी धोकादायक ठरतो. आजाराच्या लक्षणांमध्ये साम्यता असल्याने अनेकदा याकडे दुर्लक्ष केले जाते. जर ही स्थिती वेळीच व्यवस्थापित केली गेली तर रुग्णांना होणारा त्रास कमी करता येतो. कमकुवत रोगप्रतिकार प्रणाली आणि पूर्व-अस्तित्वात असलेल्या आरोग्य परिस्थितीमुळे ज्येष्ठांमध्ये न्यूमोनिया  वाढू शकतो.अशावेळी त्वरित वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. ज्येष्ठांमधील न्यूमोनियाच्या विशिष्ट जोखमींबद्दल जागरूकता वाढवण्यास अधिक प्राधान्य देणे गरजेचे आहे.

Web Title: Pneumonia in the elderly symptoms causes and treatment experts reveal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 05:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.