फोटो सौजन्य - Social Media
आजच्या युगात लव्ह मॅरेजचे प्रमाण फार वाढले आहे. प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्यांना भविष्यात अनेक गोष्टींचा सामोरा करावा लागातो. अनके गोष्टी हाताळाव्या लागतात. पण प्रेम असेल तर सगळ्या गोष्टी करणे अगदी सोयीस्कर होऊन जाते. पण अनेक प्रेमविवाह असे आहेत, जे फार काही काळ टिकत नाही. यामागे अनेक कारणे असतात. पण हे विवाह लांब पर्यंत टिकवण्यासाठी प्रेमानंद महाराजांनी काही टिप्स दिले आहेत. त्यांचा हा बहुमोल सल्ला जाणून घेऊयात:
प्रेमानंद महाराज म्हणतात की,” प्रेम केवळ शारीरिक जवळीक नसते. शारीरिक आकर्षण नसतं. प्रेमाला कधीच शारीरिक आधारावर टिकवू नका. असे प्रेम फार काळ काही टिकत नाही. आपल्या जोडीदाराला शारीरिक आकर्षणाच्या पलीकडे प्रेम करा, याने प्रेम फुलायला लागेल. तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याविषयी भाव वाढतील. आदर वाढेल.”
प्रेमानंद महाराज म्हणतात की,”तुमचे प्रेम तुमच्या आई वडिलांना पहिले सांगा. त्यांची समंती मिळवण्यासाठी प्रयत्न करा. आई वडिलांचे समर्थन महत्वाचे असते. प्रेमात दोघांनी जसे एकमेकांना सावरले तसेच समजून घेतले पाहिजे तसेच दोघे परिवारांनीही एकमेकांना सावरून घेतले पाहिजे.” लग्नाच्या अगोदर शारीरिक संबंध टाळावे. नात्यात पवित्रता ठेवण्यासाठी लग्नापर्यंत थांबावे.
प्रेमानंद महाराज म्हणतात की नात्यामध्ये प्रेम, विश्वास आणि आदर असणे आवश्यक आहे. एकमेकांवर असणारा विश्वास फार मोलाचा असतो. एकमेकांप्रती असणारे आदर जोडप्यांना एकत्र आणते. प्रेमानंद महाराज म्हणतात जर तुमच्या कुणाचा तरी भूतकाळ असेल तर त्याविषयी फारशी चर्चा करणे टाळावी. झालं ते गेलं आता वर्तमान जागा आणि भविष्य सुधारा! या तत्वांवर चालणे नात्यासाठी कधी योग्य असते. जुने प्रेम प्रकरणे खोदून काढण्यास काहीच अर्थ उरत नाही.
प्रेमानंद महाराजांचे या तत्वांवर चालले की ‘लव्ह मॅरेज’ यशस्वी होते. आयुष्यभर टिकते!