Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोरायसिस आणि मानसिक आरोग्‍य : तज्ज्ञांचा प्रभावी व्‍यवस्‍थापनासंदर्भात सल्‍ला

या आजाराबाबत जागरूकतेचा अभाव आणि गैरसमजामुळे संकोच निर्माण होते आणि उपचार आव्‍हानात्‍मक प्रक्रिया होऊन जाते, तसेच रूग्‍णांचे मानसिक आरोग्‍य व जीवनाच्‍या एकूण दर्जावर देखील परिणाम होतो. जवळपास एक-तृतीयांश सोरायसिस रूग्‍ण मानसिक आजारांनी पीडित आहेत, ज्‍यामध्‍ये नैराश्‍य किंवा चिंता यांचा समावेश आहे , ज्‍यामुळे स्थिती अधिक बिकट होऊन जाते.

  • By Vivek Bhor
Updated On: Jul 11, 2022 | 03:34 PM
सोरायसिस आणि मानसिक आरोग्‍य : तज्ज्ञांचा प्रभावी व्‍यवस्‍थापनासंदर्भात सल्‍ला
Follow Us
Close
Follow Us:

जवळपास २५ दशलक्ष भारतीय पीडित (Indian Victims) असलेला सोरायसिस (Psoriasis) हा गंभीर ऑटोइम्‍यून आजार (Autoimmune Disease) आहे, ज्‍यामध्‍ये त्‍वचेची जळजळ होणे, स्‍केलिंग (प्‍लेक्‍स) आणि त्‍चचा लालसर होणे अशी लक्षणे दिसून येतात.

या आजाराबाबत जागरूकतेचा अभाव आणि गैरसमजामुळे संकोच निर्माण होते आणि उपचार आव्‍हानात्‍मक प्रक्रिया होऊन जाते, तसेच रूग्‍णांचे मानसिक आरोग्‍य व जीवनाच्‍या एकूण दर्जावर देखील परिणाम होतो. जवळपास एक-तृतीयांश सोरायसिस रूग्‍ण मानसिक आजारांनी पीडित आहेत, ज्‍यामध्‍ये नैराश्‍य किंवा चिंता यांचा समावेश आहे , ज्‍यामुळे स्थिती अधिक बिकट होऊन जाते.

पण, आधुनिक तंत्रज्ञान व प्रगत उपचारासह सोरायसिसचे प्रभावीपणे व्‍यवस्‍थापन करता येऊ शकते. वेळेवर उपचार, नियमितपणे डर्माटोलॉजिस्‍टसोबत सल्‍लामसलत आणि प्रीस्‍क्राइब केलेल्‍या थेरपीचे पालन महत्त्वाचे आहे. आज आजाराच्‍या तीव्रतेनुसार अनेक उपचार पर्याय उपलब्‍ध आहेत. मध्‍यम केसेससंदर्भात आजाराच्‍या चक्रामध्‍ये अडथळा आणण्‍यासाठी बायोलॉजिक्‍स अत्‍यंत प्रभावी ठरले आहे आणि उपचाराच्‍या काटेकोर पालनासह त्‍वचा स्‍वच्‍छ राहू शकते.

मुंबईतील अनिषा क्लिनिकचे डर्माटोलॉजिस्‍ट डॉ. श्रीचंद जी. पारसरमाणी म्‍हणाले, ”माझ्या वैद्यकीय निरीक्षणानुसार सोरायसिस लक्षणांमुळे तणाव किंवा चिंता अनुभवणा-या रूग्‍णांची संख्‍या जवळपास ६० टक्‍के इतकी उच्‍च असू शकते. वेळेवर उपचार आणि सतत थेरपीचे पालन या आजाराचे प्रभावीपणे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी अत्‍यंत महत्त्वाचे आहे. उपचार वेळापत्रकांचे पालन आणि नियमितपणे डर्माटोलॉजिस्‍टसोबत सल्‍लामसलत मानसिक तणावाचा सामना करत असलेल्‍या रूग्‍णांसाठी नेहमीच उपयुक्‍त ठरले आहेत. आज उपलब्‍ध बायोलॉजिक्‍स सारख्‍या सुरक्षित व प्रभावी थेरपी पर्यायांसह रूग्‍ण सुलभपणे जवळपास स्वच्छ त्‍वचा प्राप्‍त करू शकतात.”

पुण्‍यातील महाराष्‍ट्र मेडिकल फाऊंडेशन येथील डर्माटोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शरद मुतालिक म्‍हणाले, ”फक्‍त उपचार प्रोटोकॉल्‍स नाही तर आरोग्‍यदायी जीवनशैली देखील सोरायसिसच्‍या व्यवस्‍थापनासाठी महत्त्वाची आहे. एखाद्या व्‍यक्‍तीच्‍या सोरायसिसचे निराकरण करण्‍याचा प्रयत्‍न करत, तसेच समुपदेशन किंवा जीवनशैली बदल किंवा समुदाय साह्य गटांच्‍या माध्‍यमातून तणावाचे व्‍यवस्‍थापन करण्‍याचा प्रयत्‍न करत व्‍यक्‍ती त्‍यांचे एकूण आरोग्‍य व मानसिक स्‍वास्‍थ्‍यामध्‍ये सुधारणा होताना अनुभवू शकतात.”

सर्वोत्तम मानसिक आरोग्‍यासाठी सोरायसिसचे व्‍यवस्‍थापन करण्‍याच्‍या पद्धती

उच्‍च रक्‍तदाब सारख्‍या आजारांप्रमाणेच सोरायसिस स्‍पष्‍टपणे दिसून येतो. या आजारासोबत येणारी चिंता, तणाव व नैराश्‍य व्‍यक्‍तीचा आत्‍मविश्‍वास व नातेसंबंध खालावू शकतात. यामुळे व्‍यक्‍तीला तुच्‍छतेचा सामना करावा लागू शकतो. वाढत्‍या प्‍लेक्‍ससह चिंता किंवा नैराश्‍य येऊ शकते आणि असे तणाव सोरायसिसची स्थिती अधिक गंभीर करू शकतात.
खालील सूचना तुम्‍हाला तुमच्‍या मानसिक स्‍वास्‍थ्‍याचे सर्वोत्तमपणे व्‍यवस्‍थापन करण्‍यामध्‍ये मदत करू शकतात:

डर्माटोलॉजिस्‍टवर विश्‍वास ठेवा

डर्माटोलॉजिस्‍टसोबतच्‍या पारदर्शकतेमधून योग्‍य उपचाराची खात्री मिळेल. वैयक्तिकृत उपचारासह तज्ञ-मान्‍यताकृत पर्यायांमध्‍ये बायोलॉजिक्‍स सारख्‍या प्रगत उपचारांचा समावेश आहे. योग्‍य आहार, व्‍यायाम व तणाव व्‍यवस्‍थापन प्रयत्‍नांसह बायोलॉजिक्‍स फ्लेअर-अप्‍सची वारंवारता व तीव्रता प्रभावीपणे कमी करते आणि रूग्‍णांना सामान्‍य जीवन जगण्‍यास मदत करते.

माहिती करून घ्‍या आणि अपडेटेड राहा

फ्लेअर-अप्‍सना प्रतिबंध करण्‍यासाठी सतत सोरायसिसकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विशिष्‍ट खा़पदार्थ, मद्यपान, धूम्रपान, तणव, वातावरणीय बदल किंवा अधिक प्रमाणात सूर्यप्रकाश अशा घटकांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. डर्माटोलॉजिस्‍टसोबत नियमितपणे सल्‍लामसलत केल्‍याने रूग्‍ण योग्‍य उपचार, विश्‍वसनीय माहिती व सल्‍ला सह अपडेटेड राहतील.

सोरायसिस केअरला प्राधान्‍य दिले पाहिजे

सोरायसिस गंभीर आजार आहे आणि या आजाराच्‍या उपचारासाठी आजीवन व्‍यवस्‍थापनाची गरज लागेल. तुम्‍हाला अनेक वर्षांपासून सोरायसिस असेल तर ते तणावपूर्ण असू शकते. तणावामुळे फ्लेअर-अप्‍समध्‍ये वाढ होऊ शकते, म्‍हणून तणावमुक्‍त राहणे हा तुमच्‍या स्‍वत:हून काळजी घेण्‍याचा एक भाग आहे, तसेच सोरायसिस केअरचा देखील भाग आहे. व्‍यायाम केल्‍याने तणाव दूर होऊ शकतो आणि दाह कमी होऊ शकतो. समाजीकरण, चिंतन, दीर्घ श्‍वास घेणे किंवा छंद जोपासणे यामुळे तणावार नियंत्रण ठेवता येऊ शकते आणि तुमचा मूड सुधारू शकतो.

पाठिंबा मागण्‍यास लाजू नका

रूग्‍ण अनेकदा त्‍यांच्‍या आजारांसंदर्भात चर्चा करणे टाळतात. पण मित्र, कुटुंबिय व प्रियजनांसोबत तुमच्‍या चिंता व समस्‍या शेअर केल्‍याने सोरायसिसमुळे निर्माण झालेल्‍या मानसिक आरोग्‍यासंबंधित समस्‍या दूर होण्‍यास मदत होऊ शकते. सोरायसिस रूग्‍णांच्‍या समूहाच्‍या संपर्कात राहिल्‍याने सामायिक अनुभव आणि सोरायसिसच्‍या प्रभावी व्‍यवस्‍थापनासाठी समस्‍या-निवारण पद्धतींच्‍या माध्‍यमातून पाठिंबा व मार्गदर्शन मिळते.

Web Title: Psoriasis and mental health expert advice on effective management see the full details here

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2022 | 03:34 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.