
घरी बनवा गुलाबाचा हलवा
रक्षाबंधनला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सणासुदीच्या दिवसांमध्ये बाजारपेठांमध्ये वेगळेच उत्साहाचे वातावरण असते. बाजारातील सर्व दुकानांमध्ये मिठाई आणि गोडाचे पदार्थ उपलब्ध झाले आहेत. पण या दिवसांमध्ये बाजारात मिळणाऱ्या मिठाईनमध्ये मोठी भेसळ केली जाते. चुकीच्या पद्धतीने आणि शिळे पदार्थ खाल्ल्यामुळे पोटासंबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आणि इतर वेळी शक्य झाल्यास घरी तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करावे. जे पदार्थ आरोग्यसाठी सुद्धा फायदेशीर असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी बाजारात आणलेली मिठाई खाण्यापेक्षा घरी गुलाब हलवा नक्की बनवून पहा. हा पदार्थ घरी आलेल्या सर्व पाहुण्यांना नक्की आवडेल.