Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासिक पाळीदरम्यान अधिक व्हजायनल दुर्गंधी का येते? कारणे आणि उपाय

Vaginal Smell Reason: मासिक पाळी दरम्यान, योनीतून एक असामान्य दुर्गंध येत असतो, जो खूप त्रासदायक असू शकतो. याची अनेक कारणे आहेत, पण सर्वात मोठे कारण म्हणजे मासिक पाळीदरम्यानची स्वच्छता. तुम्हालाही हा त्रास जाणवत असेल तर हा लेख तुम्ही वाचायलाच हवा.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 08, 2024 | 02:26 PM
मासिक पाळीदरम्यान अधिक व्हजायनल दुर्गंधी का येते? कारणे आणि उपाय
Follow Us
Close
Follow Us:

मासिक पाळी म्हणजे अशुद्ध रक्त शरीराबाहेर जाणे. हे सर्वांनाच माहीत आहे. महिलांना मासिक पाळीमध्ये येणाऱ्या रक्ताचा स्वतःचा वास असतो. पण काही महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान योनीतून प्रचंड दुर्गंधी येते आणि त्याची त्यांना लाज वाटू लागते. अशावेळी महिलांना आपल्या आजूबाजूच्या माणसांमध्ये उभे राहण्यात आणि बसण्यात खूप त्रास होतो. 

 

मासिक पाळीदरम्यान, योनीतून येणारा हा दुर्गंध अत्यंत सामान्यही असू शकतो मात्र अनेकदा महिलांना यामुळे त्रास होतो. या दुर्गंधीमागे अनेक कारणे आहेत, पण याचे सर्वाधिक मोठे कारण म्हणजे मासिक पाळीदरम्यानची स्वच्छता. मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. याशिवाय, इतर अनेक घटक आहेत ज्या विचारात घेणे आवश्यकता आहे. नाहीतर तुम्हाला पीरियड्समध्ये संसर्ग, दुर्गंधी इत्यादीसारख्या इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मासिक पाळीदरम्यान योनीतून वास येण्याची कारणे तुम्हाला माहीत झाल्यावर, त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते.

या महत्त्वाच्या विषयावर आस्था दयाल, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, सीके बिर्ला हॉस्पिटल, गुरुग्राम यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. एका हिंदी संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी मासिक पाळीदरम्यान दुर्गंध येण्याचे कारण सांगितले आहे आणि ते टाळण्यासाठी काही टिप्सही दिल्या आहेत. (फोटो सौजन्य – iStock) 

मासिक पाळीदरम्यान दुर्गंधी का येते? (Causes Of Vaginal Smell During Period)

हार्मोनल बदल

महिलांच्या मासिक पाळीच्या सायकल दरम्यान इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या पातळीत होणारे बदल हे योनीच्या पीएच संतुलनात बदल करू शकतात. यामुळे योनीमधून अधिक प्रमाणात दुर्गंधी निर्माण होते. त्यामुळे हे महत्त्वाचे कारण ठरते. 

बॅक्टेरियाशी संपर्क 

मासिक पाळीदरम्यान, योनीतून बाहेर पडणारे रक्त बॅक्टेरियाच्या संपर्कात येऊ शकते. जीवाणू रक्त खंडित करतात आणि या प्रक्रियेत काही संयुगे सोडली जातात, जे योनीच्या गंधामध्ये योगदान देतात. ही एक सामान्य नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र याचा परिणाम म्हणून कधीकधी तीव्र किंवा असामान्य गंध निर्माण होऊ शकतो. 

वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष 

चांगली स्वच्छता मासिक पाळीदरम्यान दुर्गंधावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते. पीरियड्स दरम्यान, घाम, मृत त्वचेच्या पेशी आणि बॅक्टेरिया योनीमध्ये बराच काळ जमा होतात, ज्यामुळे दुर्गंधी वाढू शकते. फक्त नियमित आंघोळ करून, अंडरवेअर स्वच्छ करून आणि वेळोवेळी सॅनिटरी उत्पादने बदलून तुम्ही मासिक पाळीचा हा दुर्गंध कमी करू शकता. 

[read_also content=”जागतिक मासिक पाळी दिन का साजरा केला जातो https://www.navarashtra.com/lifestyle/why-is-world-menstrual-hygiene-day-celebrated-on-28-may-know-the-history-importance-539172.html”]

पाळीदरम्यान दुर्गंधीचे प्रकार

धातूप्रमाणे (Metallic): मासिक पाळीच्या रक्तामध्ये लोह असते, ज्यामुळे धातूसारखा वास येतो.

कुजलेला वास (Rotten): योग्य स्वच्छतेच्या अभावामुळे किंवा कोणत्याही संसर्गामुळे मासिक पाळीत कुजलेला वास येऊ शकतो

गोड वास (Sweet Smell): जर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असेल तर तुमच्या मासिक पाळीला गोड वास येऊ शकतो

शरीराची दुर्गंधी (Body Odor): ज्याप्रमाणे घामामुळे शरीराला दुर्गंधी येते, त्याचप्रमाणे तुमच्या मासिक पाळीतही असाच वास येऊ शकतो

माशांचा वास (Fish Smell): जर तुमच्या मासिक पाळीत माशाचा वास येत असेल तर ते बॅक्टेरियल योनीसिस किंवा ट्रायकोमोनियासिस सारख्या संसर्गाचे लक्षण असू शकते

[read_also content=”तृतीयपंथीयांना मासिक पाळी येते का? https://www.navarashtra.com/latest-news/health/do-third-parties-have-menstrual-periods-the-information-is-amazing-nrng-104002.html”]

दुर्गंधीपासून वाचण्याचे उपाय (How To Stop Bad Period Smell)

  • हायड्रेटेड रहा: पूर्णपणे हायड्रेटेड राहिल्याने तुमच्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यास आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. निर्जलीकरणामुळे मासिक पाळी दरम्यान अमोनियासारखा वास येऊ शकतो, त्यामुळे पुरेसे पाणी पिऊन हायड्रेशन राखल्यास ते कमी होण्यास मदत होईल
  • संतुलित आहार ठेवा: जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स समृद्ध आहार आरोग्य सुधारण्यास मदत करतो आणि मासिक पाळीदरम्यान येणारा दुर्गंध कमी करण्यात मदत करतो. 

हे पदार्थ दुर्गंधी कमी करतात

  • दही
  • धान्य
  • लिक्विड प्रथिने
  • ताजी फळे आणि भाज्या

दुर्गंधी वाढवणारे पदार्थ

  • अति साखर असणारे पदार्थ 
  • प्रक्रिया केलेले केलेले पदार्थ आणि चरबीयुक्त पदार्थ
  • लसूण आणि कांदा सारखे तीव्र वासाचे पदार्थ
  • दारू

हायजीन कसे ठेवाल?

जर तुमच्या मासिक पाळीच्या रक्ताला माशासारखा वास येत असेल तर याचा अर्थ तुम्हाला तुमचा पॅड किंवा टॅम्पॉन बदलण्याची गरज आहे. मासिक पाळीच्या दरम्यान दुर्गंधीचा सामना करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे, त्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या – 

  • प्रवाह कमी असला तरीही, दर 4 ते 5 तासांनी तुमचे पॅड किंवा टॅम्पॉन बदला
  • जास्त वेळ लघ्वी रोखू नका
  • वॉशरूम वापरल्यानंतर प्रत्येक वेळी तुमची योनी धुवा आणि टिश्यूने वाळवा
  • एकाच वेळी दोन पॅड घालणे टाळा. यामुळे दुर्गंधी आणि संसर्ग होऊ शकतो.
  • घामाचे कपडे आणि अंडरवेअर बदला
  • मासिक पाळी दरम्यान शरीराला पुरेशी विश्रांती द्या
  • मासिक पाळी दरम्यान रेझरचा वापर करू नका
  • योनी क्षेत्र स्वच्छ आणि कोरडे ठेवा

Web Title: Reasons why vaginal smell increase during menstrual period and treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2024 | 02:26 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.