मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा होईल कमी! अंघोळी करण्याआधी शरीराला लावा 'हा' बॉडी मास्क
Skincare Routine: चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. वेगवेगळ्या क्रीम, महागडे फेसपॅक, स्किन ट्रीटमेंट करून त्वचेवरील काळेपणा कमी केला जातो. पण मान, कोपर आणि गुडघ्यांच्या त्वचेकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. मान, कोपर आणि गुडघ्याची त्वचा काळी पडल्यानंतर हळूहळू आजूबाजूचा इतर भाग सुद्धा काळा पडून जातो. त्यामुळे दुर्लक्ष न करता वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. त्वचा हळूहळू काळी पडू लागल्यानंतर शरीरावर मळ जमा होण्यास सुरुवात होते. शरीरावर मृत पेशी जमा झाल्यानंतर टॅनिंग वाढते. शरीरावर जमा झालेला मळ घालवण्यासाठी त्वचा जोरजोरात घासली जाते. पण त्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून बॉडी मास्क तयार करावा. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेचे कोणतेही नुकसान होत नाही.(फोटो सौजन्य – istock)
शरीरावरील त्वचेवर उन्हामुळे टॅनिंग वाढत नाही तर अंगावर मळ जमा होऊन राहतो. टॅनिंग किंवा पिग्मेंटेशनमुळे शरीरावरील त्वचा काळी पडते. तर काहीवेळा गोळ्या औषधांचे सेवन केल्यामुळे सुद्धा शरीरावरील त्वचा काळी पडून जाते. त्यामुळे त्वचेवरील मळ काढून टाकण्यासाठी महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. त्वचेची योग्य आणि नैसर्गिक काळजी घेतल्यास शरीरावरील त्वचा स्वच्छ होऊन त्वचा उजळदार दिसेल.
सोशल मीडियावर शरीरावरील टॅनिंग घालवण्यासाठी वेगवेगळे उपाय दाखवले जातात. लिंबू, इनो, कॉफी किंवा शाम्पू इत्यादी पदार्थ एकत्र करून त्याचा बॉडी वॉश किंवा मास्क तयार केला जातो. पण चुकीच्या पद्धतीने घरगुती पदार्थांचा वापर केल्यामुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते. इनोच्या वापरामुळे त्वचेमध्ये लालसरपणा वाढू शकतो. त्यामुळे संवेदनशील त्वचा असलेल्या महिलांनी त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे आणि कोणताही पदार्थ किंवा मास्क लावताना पॅच टेस्ट करून पाहावी.
CSU: अंगावर वारंवार पित्त उठतंय? केवळ अॅलर्जी समजण्याची चूक करू नका! जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?
उन्हामुळे किंवा टॅनिंगमुळे काळ्या पडलेल्या मानेवर घरगुती उपाय करावेत. यासाठी वाटीमध्ये एक चमचा दूध, एक चमचा हळद आणि अर्धा चमचा मध एकत्र करून मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण मानेवर, गुडघ्यांवर आणि शरीराच्या काळ्या पडलेल्या भागांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे शरीरावर जमा झालेली डेड स्किन आणि मळ कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर १० मिनिटांनी त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. याशिवाय टॅनिंग कमी करण्यासाठी केवळ फेसपॅकच नाहीतर बाहेर जाताना सनस्क्रीन लावणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. सूर्याच्या किरणांमुळे होणाऱ्या टॅनिंगपासून त्वचेचे रक्षण होईल.
Ans: मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा वाढण्यामागे घर्षण, त्वचेचा कोरडेपणा, सूर्यप्रकाश, हार्मोन्समधील बदल किंवा त्वचेतील रंगद्रव्य वाढणे अशी विविध कारणे असू शकतात.
Ans: योग्य घटक असलेला बॉडी मास्क त्वचेला ओलावा देण्यास आणि मृत त्वचेच्या पेशी काढण्यास मदत करू शकतो. मात्र, घरगुती बॉडी मास्कमुळे काळेपणा पूर्णपणे दूर होतो, याचे ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत.
Ans: त्वचेला ओलावा देण्यासाठी साधे, सुगंधरहित मॉइश्चरायझिंग उत्पादन वापरणे हा सुरक्षित पर्याय आहे. घरगुती उपाय करून पाहायचा असल्यास साधे ओट्स आणि पाणी यांचे मिश्रण त्वचेच्या छोट्या भागावर तपासून पाहू शकता.






