Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ महिलाच नाही तर पुरुषही वेगाने होत आहेत वंध्यत्वाचे शिकार , कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का

आता वंध्यत्व (Infertility) फक्त महिलांमध्येच (Women) येते असे म्हणणे चुकीचे ठरेल. आता पुरुषही (Men) या समस्यांना बळी पडत आहेत. दोघांमध्ये वंध्यत्वाचे कारण एकच आहे. त्याची प्रमुख कारणे म्हणजे तणाव, वाईट सवयी, सिगारेट-पिणे इ.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 23, 2021 | 09:09 AM
केवळ महिलाच नाही तर पुरुषही वेगाने होत आहेत वंध्यत्वाचे शिकार , कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का
Follow Us
Close
Follow Us:

भारतात स्त्री आणि पुरुष (Women And Men) दोघेही वंध्यत्वाला (Infertility) अधिकाधिक बळी पडत आहेत. केवळ शहरांमध्येच नाही तर खेडेगावातही लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात, पुण्यातील मरहूड हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पद्मा श्रीवास्तव म्हणतात की, तरुण कॉल्समध्ये आता वंध्यत्व वाढत आहे आणि ही एक धोकादायक गोष्ट आहे. यासोबतच कपल्समध्ये प्रजनन उपचारांचा वापरही झपाट्याने वाढत आहे. याचे कोणतेही स्पष्ट कारण नसून एक नाही तर अनेक घटक याला कारणीभूत असल्याचे दिसते.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कपल्सना त्यांचा अभ्यास (Study), करिअर करणे (Career) आणि सामाजिक बांधिलकी (Social Commitment) यामुळे गर्भधारणा (Pregnancy) होण्यास उशीर होतो. प्रत्येकाला माहित आहे की वयानुसार प्रजनन क्षमता कमी होते. त्याच वेळी, पुरुषांमध्ये वयानुसार वीर्याचा दर्जा घसरायला लागतो. ३५ वर्षांखालील गर्भधारणा ही सर्वात चांगली गर्भधारणा मानली जाते.

याशिवाय डायबिटीज, हाय बीपी, लठ्ठपणा आणि वयोमानानुसार त्याशी संबंधित आजारांचा धोका वाढतो, जे थेट वंध्यत्वाला कारणीभूत ठरत आहेत.

[read_also content=”से-क्स दरम्यान ऑगॅज्मची मजा घेता येत नाही? वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/relationships/relationships/i-am-not-able-to-enjoy-orgasm-and-experience-what-is-the-reason-know-the-details-in-marathi-nrvb-213504.html”]

स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे

दुसरीकडे, एंडोमेट्रिओसिस, फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज, हार्मोनल विकार, प्रदूषण, मासिक पाळीची अनियमितता, पेल्विक इन्फेक्शन आणि पीसीओएस मुळे देखील महिलांमध्ये वंध्यत्व येऊ शकते.

वाईट सवयी

तणाव कमी करण्यासाठी सिगारेट ओढणे, प्रतिबंधित औषधे वापरणे आणि दारू पिणे यामुळे स्त्री आणि पुरुष दोघांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. हानिकारक विषारी पदार्थ पुनरुत्पादक अवयवांना नुकसान पोहोचवू शकतात, शुक्राणूंच्या संख्येच्या उत्पादनावर परिणाम करतात आणि स्त्रियांमध्ये अंड्याची गुणवत्ता खराब करतात.

जास्त मद्यपान केल्याने महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता खराब होऊ शकते. त्याच वेळी, दीर्घकाळ बसणे, शारीरिक कामाचा अभाव आणि नियमित जंक, प्रक्रिया केलेले आणि पाकिटबंद केलेले खाणे यामुळे महिला आणि पुरुषांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे ज्यामुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो.

[read_also content=”प्रेमात फसवणूक झालेल्या महिलांच्या ५ गोष्टी, ज्या पुरुषांना माहित असणे आवश्यक आहे https://www.navarashtra.com/relationships/relationships/here-are-5-things-that-men-need-to-know-about-women-who-have-been-cheated-on-in-love-nrvb-213010.html”]

तणाव हे आहे मुख्य कारण

जास्त ताणतणाव घेतल्याने महिला आणि पुरुष त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतात. स्त्रियांमध्ये, तणावाचा ओव्हुलेशनवर परिणाम होतो आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनच्या पातळीवर आणि शुक्राणू तयार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

हे समजून घ्या

स्त्रीरोग तज्ञ डॉ अर्चना नरुला नवभारत टाइम्स.कॉमला दिलेल्या माहितीत म्हणतात की, स्त्रियांनी AMH आणि पुरुषांनी वीर्य विश्लेषण करून त्यांची प्रजनन क्षमता जाणून घेतली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही आयुष्यातील तुमची सर्व उद्दिष्टे साध्य करता तोपर्यंत प्रजननक्षमता तुमची वाट पाहणार नाही.

करिअरसह नियोजन

तथापि, तुम्ही तुमच्या करिअरच्या मार्गावर ही गोष्ट पूर्ण करू शकता, त्यामुळे उशीर करू नका आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. जर एखाद्या महिलेला जीवनसाथी मिळत नसेल, तर ती ३५ वर्षाच्या आधी अंडी गोठवून भविष्यात आई होण्याची शक्यता वाढवू शकते.

Web Title: Not only women but also men are fast becoming victims of infertility because knowing will shock you too nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2021 | 09:09 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.