सना मकबूल ग्रस्त असलेल्या लिव्हर सिरोसिसची लक्षणे (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)
टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी-३ विजेती सना मकबूल हिला लिव्हर सिरोसिस झाल्याचे निदान झाले आहे. ती काही काळापासून ऑटोइम्यून हेपेटायटीसने ग्रस्त आहे, जो एक क्रोनिक लिव्हरचा आजार असून यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती लिव्हरवर हल्ला करते. सना गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात असून तिने स्वतः याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती.
ही माहिती मिळाल्यापासून तिचे चाहते आणि नातेवाईक लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. सना केवळ ३२ वर्षांची असून नक्की हा आजार कसा झाला आणि याची लक्षणे कशी ओळखू शकता याबाबत आपण या लेखाद्वारे माहिती घेऊया. Cleveland Clinic ने केलेल्या अभ्यासानुसार आपण याची अधिक माहिती घेऊया (फोटो सौजन्य – Instagram/iStock)
लिव्हर सिरोसिस म्हणजे काय?
लिव्हर सिरोसिस आजार नक्की काय आहे
लिव्हर सिरोसिस हा एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये Liver च्या पेशी खराब होतात आणि हळूहळू डागांच्या ऊतींमध्ये बदलतात. हे डाग यकृताच्या सामान्य कार्यावर परिणाम करतात, ज्यामुळे रक्त स्वच्छ करणे, विषारी पदार्थ काढून टाकणे आणि पचन यासारख्या शरीराच्या आवश्यक कार्यांवर परिणाम होतो. लिव्हर सिरोसिससाठी प्रमुख जोखीम घटकांमध्ये दीर्घकालीन मद्यपान, व्हायरल हेपेटायटीस (बी आणि सी), फॅटी यकृत रोग आणि ऑटोइम्यून हेपेटायटीस यांचा समावेश आहे.
Liver Care: लिव्हर चांगले राखण्यासाठी काय खावे? वेळीच सुरू करा नाहीतर अर्ध्यातच गमवाल ‘जीव’
ऑटोइम्यून हेपेटायटीस आणि लिव्हर सिरोसिस
कशी असते लिव्हरची स्थिती
ऑटोइम्यून हेपेटायटीस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून निरोगी लिव्हर पेशींवर हल्ला करते, ज्यामुळे लिव्हरची जळजळ (हिपॅटायटीस) होते. जर या जळजळीवर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर ते दीर्घकालीन नुकसान करते ज्यामुळे लिव्हर सिरोसिस होतो.
ऑटोइम्यून हेपेटायटिस हा आजार महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो आणि त्याची लक्षणे थकवा, सांधेदुखी आणि कावीळ असू शकतात. उपचाराशिवाय, हा रोग यकृताची रचना कायमची नष्ट करू शकतो.
लिव्हर सिरोसिसची सुरुवातीची लक्षणे
सुरुवातील कोणती लक्षणे दिसतात
लिव्हर सिरोसिसची सुरुवातीची लक्षणे अनेकदा स्पष्ट नसतात, ज्यामुळे त्याचे निदान उशिरा होऊ शकते. सामान्य लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे:-
त्वचेला येतेय खाज आणि जाणवत असतील 5 संकेत, तर Liver सडून गंभीर आजार होण्याची शक्यता
काय काळजी घ्यावी
कोणत्या पद्धतीने काळजी घ्यावी
लिव्हर सिरोसिस टाळण्यासाठी वेळेवर निदान आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. तुम्ही कोणते उपाय करावेत याची माहिती घ्या
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.