जुन्या साड्यांचे काय करावे
श्रावणाच्या या पवित्र महिन्यात घराघरात उत्सवाचे वातावरण असते. या खास प्रसंगी आपले घर सजवण्यासाठी लोक विविध पद्धतींचा अवलंब करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. खरं तर, आम्ही तुम्हाला जुन्या साड्या वापरून घर सजवण्याच्या टिप्स सांगणार आहोत.
या जुन्या साड्यांमुळे तुमच्या घराला नवा लुक तर मिळेलच, पण वर्षानुवर्षे कपाटात पडलेल्या साड्यांचाही चांगला उपयोग होईल. या लेखात देण्यात आलेल्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही तुमचे घर जुन्या साड्यांनी सजवू शकता आणि सर्वांची वाहवादेखील मिळवू शकता (फोटो सौजन्य – Amazon, Pinterest)
उशांचे कव्हर्स
साड्यांपासून तयार केलेले उशीचे कव्हर
श्रावणामध्ये तुमचे घर सजवण्यासाठी भारतीय साड्यांचे सुंदर नमुने, प्रिंट्स आणि रंग पुरेसे आहेत. त्याच्या मदतीने तुम्ही उशांसाठी सुंदर आणि आकर्षक असे अभ्रे अर्थात कव्हर्स बनवू शकता. कुशन कव्हर्सना ट्रेंडी लुक देण्यासाठी तुम्ही त्यात टसल, लेस आणि पॉमपॉम्सदेखील वापरू शकता. कांजीवरम, शालू अशा जुन्या साड्यांचे कव्हर्स अधिक रॉयल दिसतात.
पडद्यांच्या स्वरूपात वापर
साड्यांचा पडदा
एका साडीची लांबी सहा मीटर असते. खिडक्या आणि दारांसाठी सुंदर पडदे बनवण्यासाठी तुम्ही जुन्या साडीचा वापर करू शकता. जर तुम्हाला संपूर्ण घरासाठी पडदे बनवायचे असतील तर तुम्ही वेगवेगळ्या साड्यांचे मिश्रण करून आणि मॅचिंग करून डिझायनर पडदे बनवू शकता. हॉलमध्ये पारदर्शक पडदे लावायचे असतील तर त्यासाठी नेटच्या साड्यांचा वापरदेखील करू शकता.
साडीचे डोअरमॅट
साड्यांपासून बनवलेले डोअरमॅट
घरात ठेवलेल्या जुन्या शिफॉन आणि जॉर्जेटच्या साड्या तुमच्या घराला नवा लुक देऊ शकतात. वास्तविक, या साड्यांपासून तुम्ही घरासाठी डोअर मॅट्स बनवू शकता. फ्लोरल प्रिंटेड साड्या तुमच्या डोअर मॅटला आणखी सुंदर बनवू शकतात. याचा लुक अधिक रॉयल आणि क्लासी दिसतो.
सोफा सेट कव्हर्स
सोफा कव्हर्ससाठी साड्यांचा उपयोग
सणासुदीला घर सजवण्यासाठी तुम्ही तुमच्या जुन्या साड्यांपासून सोफा सेटसाठी कव्हरही बनवू शकता. प्रिंटेड आणि डिझाईन केलेल्या साड्यांव्यतिरिक्त, तुम्हाला हव्या असल्यास, तुम्ही साध्या साडीसह सोफ्यालाही वेगळा आणि ट्रेंडी लुक देऊ शकता. तुम्हाला बाजारात अनेक प्रकारची सजावटीची बटणे मिळतील. तुम्ही ते सोफा कव्हरलाही सुंदरपणे जोडू शकता.