अनुपमा या अतिशय लोकप्रिय ठरलेल्या मालिकेत धीरज कुमारची भूमिका साकरणारा अभिनेता नितेश पांडे (nitesh pandey) यांचं बुधवारी हृदयविकाराच्या (heart attack) झटक्यानं निधन झालं. ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणं आपल्या डोळ्यासमोर नेहमी घडताना दिसतात. हृदयविकार टाळण्यासाठी किंवा हृदयाशी संबंधित आजाराला दूर ठेवण्याचा डॉक्टर नेहमीच सल्ला देत असतात. निलेश पांडे यांचं वयाच्या 51 व्या वर्षी निधन झाल्याने टीव्ही इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणावरूनच आपल्याला हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे हे स्पष्ट होतं.
[read_also content=”‘अनुपमा’ फेम अभिनेते नितेश पांडे यांचे निधन, हार्टअटॅकने निधन झाल्याची माहिती https://www.navarashtra.com/entertainment/nitesh-pandey-death-small-screen-anupama-heart-attack-nrsa-403453/”]
भारतात हृदयविकाराच्या वाढत्या घटनाअचानक हृदयविकाराचा मृत्यू Sudden Cardiac Death (SCD) हा हृदयविकाराच्या कारणांमुळे होणारा नैसर्गिक मृत्यू आहे. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी बदलांमध्ये तीव्र बदल सुरू झाल्यानंतर एका तासाच्या आत अचानक चेतना नष्ट झाल्यामुळे होतो. अलीकडे आपण विशेषत: तरुणांमध्ये SCD च्या संख्येत वाढ पाहिली आहे. सामान्य कारणे म्हणजे कोरोनरी धमन्यांमधील अडथळा, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात हृदयविकाराचा झटका आणि हृदयाच्या लयशी संबंधित विकार होऊ शकतात. कोविड-19 नंतर ह्रदयविकाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
तर हृदयविकार टाळण्यासाठी नियमित व्यायामाबरोबरच संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहावं.
हार्ट अटॅकची लक्षणे – जसे की छातीत दुखणे, धाप लागणे, जबडा-मान-मागे-हाता-खांदा दुखणे, मळमळ, चक्कर येणे. ही लक्षणे लक्षात ठेवा आणि ती दिसताच डॉक्टरांकडे धाव घ्या.
[read_also content=तुम्हाला अतिथकवा जाणवतोय!!! मग,आताच मीठाचं प्रमाण कमी करा https://www.navarashtra.com/lifestyle/salt-dangerous-for-health-nrms-403277/”]
गोड खाणे शक्यतो टाळा – डायबेटीस असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. तसंच,गोड पदार्थ खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉलही वाढू लागते.
मीठाचे प्रमाण कमी करा- आवश्यकतेपेक्षाही जास्त मीठ खात असाल. तर, उच्च रक्तदाबाचा धोका लक्षणीय वाढतो. नसा कमकुवत होतात. हाय ब्लडप्रेशरमुळे हृदयावर दाब वाढतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो.
चर्बीयुक्त पदार्थांचं सेवन टाळा – शक्यतो पिझ्झा,बर्गर, समोसे, वडापाव, पुरी यांसारखे पदार्थ आरोग्यास हानिकारक आहेत. हे चवीला चमचमीत असले तरी यामध्ये असलेले सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स शरीरातील LDL कोलेस्ट्रॉल वाढवतात यामुळे ब्लॉकेजेस होऊ शकतात. हृदयाला ऑक्सिजन आणि पोषण मिळण्यासाठी अडथळे निर्माण होतात आणि हार्टअटॅक येतो.
व्यसनांपासून दूर राहा – अनेकजण स्ट्रेस घालवण्यासाठी दारू किंवा सिगरेट, तंबाखूचं सेवन करतात. हे व्यसन प्रत्येक अवयवासाठी घातक आहे. यामुळे,ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी वाढते. त्यामुळे,हार्ट अटॅक टाळण्यासाठी या गोष्टींपासून दूर राहा.