आयुष्यात प्रेम करणं खूप सोपं आहे पण ते निभावणं मात्र तितकंच कठीण आहे. केवळ एकमेकांसाठी सुख शेअर करणं म्हणजे प्रेम नाही. सतत हसतखेळत राहणं याला प्रेम म्हणतात का? तर नक्कीच नाही. आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आणि लोकप्रिय अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी नातं आनंदी कसं राहील याबाबात काही टिप्स शेअर केल्या आहेत.
तुम्हालाही तुमचे नाते आनंदी आणि दीर्घकाळ टिकवायचे असेल, तर श्री श्री रवी शंकर यांचे काही कोट्स आणि त्यांच्या काही टिप्स या तुम्हाला नक्कीच आयुष्यात मदत करतील. तुम्हीही प्रेम म्हणजे नक्की काय आणि अशा अनेक प्रश्नांनी त्रस्त असाल तर हा लेख केवळ तुमच्यासाठी आहे. नातं सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही त्यामुळे तुम्ही या टिप्स नक्की लक्षात घ्या. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/iStock)
गरजेपेक्षा अधिक जोडीदाराकडे लक्ष देऊ नका
श्री श्री रवी शंकर यांच्या सांगण्यानुसार, जर तुमचे जीवन काही ध्येय साध्य करण्यावर केंद्रित असेल तर तुम्ही त्या दिशेने वाटचाल कराल आणि तुमचे नातेही पुढे जाईल. पण जर तुमचे संपूर्ण लक्ष फक्त तुमच्या नात्यावर असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. जोडपं म्हणून एकत्र राहणं आणि संसार करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आपण वैयक्तिक वाढ आणि जीवनातील यशांवरदेखील लक्ष केंद्रित केले पाहिजे, जे आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवेल आणि नातंही त्यामुळे सुदृढ राहील.
[read_also content=”नातं टिकविण्यासाठी बोलणं महत्त्वाचं https://www.navarashtra.com/lifestyle/how-to-maintain-relationship-need-to-speak-with-each-other-on-daily-basis-to-solve-problems-539425.html”]
एकमेकांना स्पेस देणे
प्रेम फुलण्यासाठी इच्छा किंवा तळमळ आवश्यक आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सतत एकमेकांना चिकटून राहायला हवं. तुमच्या मनातील इच्छा नाहीशी केली किंवा तुमच्या नात्यात इच्छेला स्थान दिले नाही तर प्रेम बहरत नाही. त्यामुळे एकमेकांना योग्य वेळ द्या आणि एकमेकांना स्पेसही द्या. जेणेकरून तुम्ही अधिक चांगले एकमेकांना ओळखू शकाल. अंतराने प्रेम वाढते. त्यामुळे काही वेळा एकमेकांमध्ये अंतर राखणेही गरजेचे आहे.
नात्यात घ्यायलाही शिका
श्री श्री रविशंकर म्हणतात की नात्यात, समोरची व्यक्तीही तुमच्या जीवनात किती योगदान देते हे पहा. मात्र सतत तुम्ही एखाद्याला सर्वस्व देत राहू नका. घ्यायलाही शिका. प्रेम फुलण्यासाठी स्वाभिमान आवश्यक आहे. हे मानसशास्त्रानुसारदेखील खरे आहे, त्याला बेंजामिन फ्रँकलिन प्रभाव म्हणतात. यानुसार, जोडीदाराचा सल्ला घेण्यास किंवा लहान कामे सोपविण्यात अजिबात संकोच करू नका. एकमेकांवर अवलंबून राहणे कधीतरी चांगले असते. त्याने प्रेम वाढते.
[read_also content=”काय आहे टॉक्झिक ब्रेंडक्रंबिंग ट्रेंड https://www.navarashtra.com/lifestyle/what-is-toxic-dating-trend-breadcrumbing-know-the-signs-hows-to-handle-it-538924.html”]
गोष्टी सोडायला शिकणे
श्री श्री रवी शंकर यांच्या सांगण्यानुसार, अनेकांना आपल्या जोडीदारावरील नियंत्रण सोडण्याची समस्या असते. यामुळे अस्वस्थता निर्माण होते आणि संबंधही बिघडतात. त्यामुळे तुम्ही नात्यात असताना काही वेळा आरामात बसा आणि ध्यानासारख्या सजगतेचा अवलंब करा, ज्याचा तुमच्या नातेसंबंधांवर सकारात्मक परिणाम होईल. गोष्टींकडे काही वेळा दुर्लक्ष करणे चांगले ठरते.
नेहमी आदर राखा
श्री श्री रविशंकर म्हणतात की प्रत्येक नातेसंबंधात आदर हाच नाते वाचविण्यास आधार ठरतो. बऱ्याचदा तुम्ही नकळतपणे एकमेकांबाबत आदर गमावता. तुमच्या वागणुकीमुळे ही गोष्ट घडते. मात्र आदर हा तुम्हाला लोभ, मत्सर आणि वासनेपासून मुक्त करतो. म्हणून, तुमच्या आयुष्यात जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञतेचा भाव बाळगा. जोडीदाराबाबत आदर ठेवा. नातं टिकवणे अधिक सोपे होईल.