महिलांचा सिक्स्थ सेन्श खूपच शार्प असतो असं अनेकदा म्हटलं जातं. तिच्या मनात असेल तर ती कोण व्यक्ती कोणत्या हेतूने आपल्याशी बोलत आहे अथवा कोणच्या मनात नक्की काय आहे हे ओळखू शकते. आता एका संशोधनात या गोष्टीला वैज्ञानिक आधार देण्याचा दावा करण्यात आला आहे.
पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील ARC सेंटर ऑफ एक्सलन्स इन कॉग्निशन अँड इट्स डिसऑर्डर्सच्या संशोधकांच्या एका समूहाने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की स्त्रिया चेहऱ्यावरील विशिष्ट वैशिष्ट्ये पाहून पुरुषाचे विवाहबाह्य संबंध आहेत की नाही याचा अंदाज लावू शकतात. (फोटो सौजन्य – iStock)
असा केला अभ्यास
बायोलॉजी लेटर्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेले हे संशोधन डॉ. गिलियन रोड्स यांनी त्यांच्या टीमसह केले. संशोधनात सहभागी महिलांना पुरुषांची छायाचित्रे दाखवण्यात आली आणि त्यांना या पुरुषांचे विवाहबाह्य संबंध असण्याची शक्यता विचारण्यात आली. या छायाचित्रांमध्ये समाविष्ट असलेल्या पुरुषांबाबत कोणत्याही प्रकारची माहिती या महिलांना देण्यात आली नव्हती.
[read_also content=”‘आता मुलं सल्ला घेत नाहीत’…सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाबाबत व्यक्त झाले वडील शत्रुघ्न सिन्हा, मुलांच्या या गोष्टींनी वडिलांचे सुटते धैर्य https://www.navarashtra.com/lifestyle/sonakshi-sinha-marriage-decision-broke-father-shatrughan-sinha-mistakes-that-breaks-fathers-heart-546668/”]
महिलांच्या उत्तराने अवाक्
संशोधनाचे निष्कर्ष वाचून तुम्हीही हैराण व्हाल. महिलांच्या अंदाजाचे विश्लेषण करताना असे आढळून आले की त्यांनी ज्या पुरुषांचे फसवणूक करणारे म्हणून वर्णन केले होते त्यांचे खरंच विवाहबाह्य संबंध होते. तथापि, यावर संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे, हे निष्कर्ष प्राथमिक आहेत आणि अधिक तपास करणे आवश्यक आहे.
चेहऱ्यावरून लावला अंदाज
या संशोधनाची विशेष बाब म्हणजे महिलांना केवळ छायाचित्रे पाहून पुरुषांच्या वर्तणुकीचा अंदाज लावता येत होताय तथापि, संशोधकांनी पुरुषांच्या चेहऱ्याचे कोणते वैशिष्ट्य पाहून महिला हा अंदाज काढत आहेत याबाबत मात्र संशोधकांनी सांगितलेले नाही. मात्र पुरूषांच्या चेहऱ्याकडे पाहून महिलांनी त्यांचे विवाहबाह्य संबंध आहेत की नाही याबाबत योग्य अंदाज लावल्याचे त्यांनी या अभ्यासात म्हटलं आहे.