जेवताना केलेल्या 'या' चुकांमुळे वाढतो किडनी स्टोनचा धोका, आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास लघवीवाटे वाहून जाईल मुतखडा
किडनी स्टोन होण्याची कारणे?
जीवनशैलीतील कोणत्या चुकांमुळे वाढतात आजार?
मुतखडा वाहून जाण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन?
kidney Stones: किडनीचे आरोग्य कायमच चांगले राहण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांच्या सेवनासोबतच भरपूर पाणी पिण्याची सल्ला दिला जातो. पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडून जातात. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे अतिशय महत्वाचे अन्यथा किडनीच्या आजारांची लागण होते. किडनीमध्ये स्टोन होण्याची प्रक्रिया केवळ कमी पाण्याच्या सेवनामुळे नाहीतर लघवीतील विशिष्ट घटकांचे प्रमाण खूप जास्त वाढल्यामुळे किडनीमध्ये स्टोन तयार होतात. लहान क्रिस्टल्स तयार झाल्यानंतर पोटात वेदना, लघवी करताना जळजळ होणे, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. कॅल्शियम ऑक्सालेट स्टोन तयार झाल्यानंतर योग्य उपचार केल्यामुळे लघवीवाटे विरघळून जातात.(फोटो सौजन्य – istock)
आहार, लघवीचे रासायनिक संतुलन, आनुवंशिकता आणि पाण्याचे प्रमाण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम किडनीच्या आरोग्यावर लगेच होतो. त्यामुळे किडनी स्टोन झाल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. लघवीतील कॅल्शियम, ऑक्सालेट आणि इतर घटकांचे संतुलन, आहारातील जास्त मीठ, आनुवंशिकता आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर किडनीमध्ये छोटे छोटे खड्डे होतात. हे खड्डे कालांतराने मोठे होऊन संपूर्ण आरोग्यावर परिणाम करतात. चला तर जाणून घेऊया कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे किडनीमधील स्टोन लघवीवाटे बाहेर पडून जातो, याबद्दल सविस्तर माहिती.
ऑक्सालेट हा घटक वनस्पतीजन्य अन्नपदार्थांमध्ये नैसर्गिकरीत्या आढळून येतो. पालक, बीट, सुका मेवा, चॉकलेट, चहा आणि इतर काही वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये ऑक्सालेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ऑक्सालेट युक्त पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींना कधीही किडनी स्टोनचा त्रास होत नाही. शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणातच ऑक्सालेट असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. वारंवार कॅल्शियम ऑक्सालेट स्टोन होत असतील तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
आहारात जास्त मीठ किंवा सोडियम असल्यास पदार्थांचे सेवन केल्यास लघवीद्वारे कॅल्शियम बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते आणि किडनी स्टोनचा धोका वाढू लागतो. त्यामुळे आहारात अतिप्रमाणात मिठाचे सेवन करणे टाळावे. मिठाच्या सेवनामुळे केवळ किडनीवरच नाहीतर संपूर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. लिंबू, संत्री यांसारख्या सायट्रिक फळांमध्ये लघवीत तयार होणारे क्रिस्टल्स आढळून येतात. अतिप्रमाणात मटण, मासे किंवा इतर मांसाचे सेवन केल्यामुळे लघवीचे रासायनिक संतुलन बिघडून जाते.
शरीर हायड्रेट आणि कायमच स्वच्छ ठेवण्यासाठी शरीराला पाण्याची फारच आवश्यकता असते. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते. पुरेसे पाणी पिणे किडनी स्टोन रोखण्यास मदत करतो. त्यामुळे दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. आवश्यक प्रमाणात पाण्याचे सेवन केल्यामुळे किडनीमधील किडनी स्टोन लघवीवाटे बाहेर पडून जाण्यास मदत होते.
Ans: पालेभाज्या व इतर भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये आणि संतुलित प्रमाणात प्रथिने यांचा आहारात समावेश करा. पुरेसे पाणी पिणेही महत्त्वाचे आहे. मात्र, मुतखड्याचा प्रकार लक्षात घेऊन आहारात बदल करणे आवश्यक असू शकते.
Ans: होय, काही लहान मुतखडे उपचारांशिवाय लघवीवाटे बाहेर पडू शकतात. मात्र, हे खड्याचा आकार, स्थान आणि रुग्णाच्या स्थितीवर अवलंबून असते. मोठ्या खड्यांसाठी औषधे किंवा वैद्यकीय प्रक्रियेची गरज लागू शकते.
Ans: तीव्र वेदना, ताप किंवा थंडी वाजणे, सतत उलट्या होणे किंवा लघवी होण्यात अडचण येणे अशी लक्षणे असल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. विशेषतः तापासोबत मुतखड्याची लक्षणे दिसणे गंभीर ठरू शकते.






