Weight Loss: पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने कमी! भूक लागल्यानंतर 'या' पदार्थांचे आवर्जून करा सेवन, राहाल कायमच फीट
Weight Loss: वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केला जातो. व्यायाम, सकाळचा नाश्ता न करणे, सप्लिमेंटस, गोळ्या इत्यादी अनेक गोष्टीचे सेवन केले जातो. वजन कमी करण्यासाठी कायमच उपाशी राहणे योग्य नाही. पण कमी खाल्ल्यामुळे वारंवार भूक लागते आणि सतत काहींना काही गोड, तिखट पदार्थ खाण्याची ईच्छा होते. अशावेळी आहारातून पदार्थ पूर्णपणे काढून टाकण्याऐवजी कमी कॅलरी आणि पाणीदार पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. पाणीदार पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील अनावश्यक चरबीचा घेर कमी होण्यास मदत होते आणि पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.(फोटो सौजन्य – istock)
वजन कमी करण्यासाठी आहारात दुधी भोपळ्याचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. दुधीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. दुधीचा रस किंवा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये, आमटीमध्ये टाकून खाऊ शकता. यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे दोडका, पडवळ आणि घोसाळे इत्यादी भाज्यांचा सुद्धा आहारात समावेश करावा. संतुलित आहार घेतल्यास वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच दिवसांमध्ये आहारात काकडीचा समावेश केला जातो. काकडीच्या सेवनामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. जेवणासोबत काकडी खाल्ल्यामी कमी कॅलरीजमुळे अन्नाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. काकडीसोबत टोमॅटो, बीट आणि इतर भाज्यांचा सॅलड म्हणून आहारात समावेश करावा.
कोबी, भेंडी, पालक आणि मेथी यांसारख्या भाज्यांमधून तंतू आणि विविध पोषक घटक असतात. या भाज्यांच्या सेवनामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. भाज्यांच्या सेवनामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि लवकर काहीच खाण्याची अजिबात इच्छा होत नाही. पण कोबी आणि फ्लॉवरसारख्या भाज्यांमुळे काहींना ऍसिडिटीचा किंवा पचनाचा त्रास होऊ शकतो. पोट फुगण्याची समस्या असलेल्या व्यक्तींनी या भाज्यांचे सेवन योग्य प्रमाणात करावे.
मुळा आणि फ्लॉवर यांचाही आहारात समावेश करणे शरीरासाठी फायदेशीर आहे. या भाज्यांच्या सेवनामुळे पोटावर वाढलेली चरबी कमी होण्यासोबतच आतड्यांमधील घाण स्वच्छ होण्यास मदत होते. पोट आणि आतडे स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी मुळ्याची भाजी खावी. आहारात डाळी, कडधान्ये, दही यांसारखे प्रथिनांचे स्रोत असलेले पदार्थ खावेत.
Weight Loss Tips: सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने खरंच लवकर फॅट बर्न होते? जाणून घ्या सत्य
रोजच्या आहारासाठी कमीत कमी तेलाचा आणि तुपाचा वापर जेवणासाठी करावा. अतिप्रमाणात तेलाचा वापर केल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते आणि शरीराला हानी पोहचते. त्यामुळे कमीत कमी तेलाचा वापर जेवण बनवताना करावा. नियमित चालणे, पुरेशी झोप आणि संतुलित आहार या सवयींमुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल.
Ans: भूक लागल्यावर फळे, काकडी, गाजर, भाजलेले चणे, साखर न घातलेले दही, उकडलेली अंडी किंवा मर्यादित प्रमाणात सुका मेवा असे पौष्टिक पदार्थ खाऊ शकता.
Ans: प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थ, जसे की डाळी, कडधान्ये, भाज्या, फळे, ओट्स आणि संपूर्ण धान्ये पोट जास्त वेळ भरलेले ठेवण्यास मदत करतात. मात्र, केवळ एखादा पदार्थ खाल्ल्याने पोटावरील चरबी कमी होत नाही.
Ans: वजन वाढणे हे दिवसभरातील एकूण कॅलरी सेवन, शारीरिक हालचाल आणि इतर घटकांवर अवलंबून असते. योग्य प्रमाणात पौष्टिक पदार्थ खाल्ल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.






