या लोकांनी चुकूनही करू नका तुरटीच्या पाण्याची अंघोळ?
देशभरात सगळीकडे थंडीचा कडाका वाढू लागला आहे. थंडी वाढल्यानंतर आरोग्यासह त्वचेसंबंधित अनेक समस्या जाणवू लागतात. त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर भेगा पडणे, त्वचेच्या साली निघणे, त्वचा काळवंडलेली दिसू लागणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक महिला अंघोळीच्या पाण्यात तुरटी किंवा मिठाचा वापर करतात. तुरटीचा वापर अंघोळीच्या पाण्यात केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये अॅंटी-सेप्टिक, अॅंटी-फंगल आणि अॅंटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे त्वचेवर पडलेल्या भेगा, जखमा होण्यास मदत होते. अंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवून अंघोळ केल्यामुळे हातापायांचे दुखणे कमी होते, त्वचेवरील डाग कमी होणे, शरीराची दुर्गंधी कमी येणे इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. पण थंडीच्या दिवसांमध्ये तुरटीच्या पाण्याने अंघोळ करणे योग्य आहे का? कोणत्या समस्या असलेल्या लोकांनी तुरटीच्या पाण्याने अंघोळ करू नये? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक लोक तुरटीच्या पाण्याचा वापर करतात., मात्र तुरटीचे पाणी सर्वच त्वचेच्या प्रकाराला सूट होईल असे नाही. तुरटीचा वापर केल्यामुळे त्वचा ड्राय होते. म्हणून तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा आणखीनच ड्राय होऊ शकते. त्यामुळे ज्यांची त्वचा ड्राय आहे त्यांनी तुरटीच्या पाण्याने अंघोळ करू नये. मात्र तेलकट त्वचा असलेल्या लोकांसाठी तुरटी फायदेशीर ठरू शकते.
पचनक्रिया बिघडल्यानंतर त्वचेवर पिंपल्स किंवा पुरळ येण्यास सुरुवात होते. अशावेळी तुरटीच्या पाण्याचा वापर करून तुम्ही त्वचेवर आलेले पिंपल्स घालवू शकता. तुरटीमध्ये असलेले अॅंटी-सेप्टिक, अॅंटी-बॅक्टेरिअल गुणधर्म त्वचेवर पिंपल्स वाढू देत नाहीत. शिवाय हानिकारक बॅक्टेरियापासून त्वचेचा बचाव होतो. अंघोळ करण्याच्या पाण्यात तुरटी फिरवून अंघोळ केल्यास पिंपल्स पुरळ कमी होतील.
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेवर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्वचेवर इन्फेक्शन झाल्यानंतर त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. अशावेळी अंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवून लावल्यास इन्फेक्शन कमी होऊन आणि आराम मिळेल. याशिवाय त्वचेसंबंधित इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही तुरटीच्या पाण्याचा वापर करू शकता.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
थंडीच्या दिवसांमध्ये शरीरावर लागल्यानंतर किंवा खरचटल्यावर जखमा होतात. अनेकदा या जखमा मोठ्या होऊ लागतात. त्यामुळे जखम झाल्यानंतर तुरटीच्या पाण्याने जखम स्वच्छ करावी. जखम लवकर बरी होऊन आराम मिळेल.