Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राशीभविष्य, १० एप्रिल २०२२; मीन राशीने काही मित्रांपासून रहावे सावध, पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस

  • By Aparna Kad
Updated On: Apr 10, 2022 | 06:20 AM
राशीभविष्य, १० एप्रिल २०२२; मीन राशीने काही मित्रांपासून रहावे सावध, पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस
Follow Us
Close
Follow Us:

मेष :

विद्यार्थ्यांना इच्छित यश प्राप्त करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागू शकते.कामाच्या ठिकाणी अधिकारी वर्ग आणि सहकाऱ्यांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचा तुम्हाला फायदा होईल. व्यवसायात होणाऱ्या प्रगतीमुळे आनंदी राहाल.नवीन कामात आपल्या आईवडिलांचे सहकार्य घेणे फायदेशीर ठरेल.विवाहासाठी चांगली स्थळे येतील तसेच शुभवार्ताही ऐकायला मिळू शकते.

वृषभ :

इतरांना सहकार्य केल्याने तुम्हाला समाधान प्राप्त होते त्यामुळे आजचा दिवस परोपकारी कामे करण्यात घालवाल. कामाच्या ठिकाणी तुमच्याशी संबंधित काही बदल घडू शकतात,ज्यामुळे तुमच्या कार्यकौशल्यात वृद्धी होईल. घरातील वृद्ध माणसांच्या आशीर्वादातून प्रेरणा मिळेल. संध्याकाळच्या वेळी घरातील एखाद्या सदस्याच्या स्वास्थ्यात बिघाड झाल्याने अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मिथुन :

आजचा दिवस आपल्या परिजनांसोबत अगदी सुखात जाईल.आनंद वाढवणारी शुभवार्ताही मिळेल. सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना फायदा होईल आणि आर्थिक पक्ष बलशाली बनेल.व्यवसायात योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाने फायदा होईल.विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे.संध्याकाळच्या वेळी पाहुणेमंडळी घरी येण्याची शक्यता आहे तसेच एखाद्या कार्यक्रमात जाण्याने आपल्या सन्मानात वाढ होण्याचीही शक्यता आहे.

कर्क :

वडिलांच्या आशीर्वाद आणि सहकार्यामुळे संपत्ती प्राप्त करण्याची इच्छा पूर्ण होईल. प्रिय तसेच महान अश्या व्यक्तींच्या दर्शनामुळे मनोबल वाढेल.कामात व्यस्तता असूनही आपल्या प्रेमजीवनासाठी चांगला वेळ काढू शकाल.भावांच्या मदतीने अडलेली कामे पूर्ण होतील.राजनीती संबंधित व्यक्तींना लाभ होईल.तसेच आकस्मिक धनप्राप्तीचे योग बनतील.संध्याकाळच्या वेळी वाहन चालवताना काळजी घ्यावी.

सिंह :

कौटुंबिक व्यक्तींशी आलेल्या संपर्कातून लाभ मिळेल आणि अडकून पडलेले पैसे परत मिळून कोषवृद्धी होईल.व्यावसायिक योजनांना गती मिळेल आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. मागील काही काळापेक्षा आज पैश्यांची आवक वाढेल.दैनिक खर्च अगदी सहज भागवून भविष्यासाठी बचतही करू शकाल.बाहरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे अन्यथा आरोग्यावर वाईट परिणाम होतील.प्रेमजीवनात गोडवा निर्माण होईल.तसेच भेटवस्तू मिळण्याचीही शक्यता आहे.

कन्या :

दिवसाच्या सुरुवातीस काही महत्वपूर्ण कार्यासंबंधित निर्णय घेताना द्विधा मनस्थिती निर्माण होईल परंतु परिजनांकडून किंवा वरिष्ठ व्यक्तींकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे त्यातून सहज बाहेर पडू शकाल. आपल्या मुलांसंबंधित कर्तव्याची पूर्ती होईल.प्रतिस्पर्धेच्या क्षेत्रात उन्नती होईल तसेच मित्रांच्या सहकार्यामुळे अडलेली कामे पूर्ण होतील.खानपानाची योग्य काळजी घ्यावी.संध्याकाळचा वेळ स्नेहीजनांसोबत मजेत जाईल.

तूळ :

कामाच्या क्षेत्रात नशिबाची साथ मिळाल्याने प्रतिस्पर्धा असतानाही चांगला लाभ मिळेल.धनवृद्धीसोबतच इतर सुखसुविधांतही वाढ होईल.वृद्ध व्यक्तींच्या सेवेसाठी व पुण्यकार्यासाठी पैसे खर्च केल्याने मनाला आंनद प्राप्त होईल.दांपत्यजीवनात सुखद स्थिती अनुभवाल. आज कोणत्याही लहानमोठ्या वादात सहभाग घेणे टाळा. अन्यथा भविष्यात फायद्याचे ठरणारे नातेसंबंध बिघडू शकतात.

वृश्चिक :

विद्यार्थ्यांसाठी आज शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रात विशेष संधी प्राप्त होतील. आपल्या स्नेह्यांकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.परंतु यामागे स्वार्थही दडलेला असू शकतो.भावांच्या सहकार्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील.व्यापारातील धावपळीमुळे वातावरणाचा विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.त्यामुळे सतर्कता बाळगावी.आपल्या जोडीदाराचे उत्तम सानिध्य आणि सहकार्य लाभेल.

धनू :

आज तुमच्या व्यक्तित्वाचा विकास होईल.कामाच्या ठिकाणी काही जुन्या गोष्टींसदर्भात आपल्या सहकर्मी वर्गासोबत वैर निर्माण होऊ शकते परंतु विवेक जागरूक ठेवल्यास परिस्थिती फार गंभीर होणार नाही. अन्यथा जुने व्यवसायिक संबंध बिघडण्याची शक्यता आहे.अडलेली कामे पूर्ण होतील.तसेच प्रिय व्यक्तींची भेट होईल व फिरण्याचा योग जुळून येईल.

मकर :

सुखोपभोगाच्या साधनात वृद्धी होईल.कामाच्या ठिकाणी आर्थिक पक्ष मजबूत राहील.तसेच मानसन्मानात व किर्तीत वाढ होईल. आपल्या जिभेवर ताबा न ठेवल्यास विपरीत परिणामांचा सामना करावा लागू शकतो.पैश्यांच्या देवणघेवणीत सतर्कता बाळगा अन्यथा पैसे अडकून राहू शकतात.कोर्टकचेरीच्या फेऱ्या घालाव्या लागू शकतात.ज्यात तुमचा विजय होईल व तुमच्या विरोधातील सर्व षडयंत्र विफल ठरतील.

कुंभ :

आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या.गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा व सोशल डिस्टनसिंगचे पालन करा.सामाजिक क्षेत्रात तुम्हाला बुद्धीमान व्यक्ती म्हणून मान मिळेल परंतु कुटुंबामध्ये तुम्हाला कारस्थानी समजले जाईल. घरगुती वापराच्या वस्तूंवर खर्च होईल.संध्याकाळच्या वेळी धार्मिक क्षेत्रांना भेटी देण्याचा योग ऐनवेळी स्थगित होईल.वाहन चालवताना विशेष काळजी घ्या.वाहनात आकस्मित बिघाड उद्भवल्याने खर्चात वाढ होऊ शकते.

मीन :

मित्रांकडून तुमच्या पदरी निराशा येण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल. व्यवसायाच्या क्षेत्रात इच्छित लाभ मिळाल्याने आनंदी व्हाल.नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या बुद्धीच्या बळावर उन्नती प्राप्त करता येईल. व्यवसाय परिवर्तनाची योजना बनवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.स्पर्धापरीक्षेत विद्यार्थ्यांना यशप्राप्ती होईल.तसेच कौटुंबिक कर्तव्य पूर्ण होतील.

 

Web Title: Todays daily horoscope 10th april 2022 pisces needs to be careful from some of friends nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2022 | 06:20 AM

Topics:  

  • daily horoscope
  • todays daily horoscope

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.