यंदाच्या वर्षात 'या' योगा ट्रेंड्सना मोठी पसंती
निरोगी जीवन जगण्यासाठी पोषण आहारासोबतच नियमित व्यायाम आणि योगासने करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. नियमित योगासने केल्यामुळे हाडांमधील लवचिकता वाढते, शरीरातील स्नायूंसाबंधित समस्या कमी होतात इत्यादी अनेक फायदे शरीराला होतात. धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. पण असे केल्यामुळे आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे कामासोबतच शरीराकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी नियमित व्यायाम आणि योगासने करणे आवश्यक आहे. यामुळे मन शांत राहते आणि शरीराला फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी नियमित योगासने केल्यास शरीरातील स्नायू लवचिक होतील, रक्तभिसरण सुधारेल, त्वचेवर नैसर्गिक चमक वाढण्यास मदत होईल. आज आम्ही तुम्हाला 2024 या वर्षात कोणते योगा ट्रेंड्स गुगलवर सार्वधिक सर्च करण्यात आले, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
जीवनात नवीन अनुभव घेण्यासाठी अनेक लोक समुद्रकिनारी, पर्वत किंवा कोणत्याही साहसी ठिकाणी जाऊन योगासने करतात. तिथे असलेल्या शांत आणि सौंदर्यात अनेकांना योगा करायला खूप आवडतो. तसेच हा एक चांगला अनुभव सुद्धा आहे. मानसिक आरोग्य निरोगी आणि शांत ठेवण्यासाठी मैदानी आणि साहसी योगा केला जातो.
डेस्क योगा तुम्ही कामाच्या ठिकणी बसूनसुद्धा करू शकता. यामुळे आरोग्याला आराम मिळेल. सतत काम करून थकल्यानंतर शरीराला शांतता आणि आरामाची आवश्यकता असते. अशावेळी तुम्ही डेस्क योगा करू शकता. सतत एका जागेवर बसून काम केल्यामुळे पाठदुखी,कंबरदुखी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी डेस्क योगा करण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो.
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी योगासने केल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतील. त्वचेची काळजी घ्याल अनेकांना आवडते. यासाठी फेस योगा केला जातो. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि चमकदार दिसू लागते. चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मसाज केल्यामुळे त्वचेमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
निरोगी आरोग्यासाठी नियमित योगा करणे आवश्यक आहे. त्यातील सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला हवाई योगा केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. हा योगा करण्यासाठी एरियल हॅमॉक्सचा वापर केला जातो, ज्याच्या मदतीने हवेत योगासने केली जातात. यामुळे शरीराची लवचिकता वाढते, रक्तभिसरण सुधारते आणि शरीराला अनेक फायदे होतात.