tulsi vivah
दिवाळी संपली की लगबग सुरू होते ती तुळशीच्या लग्नाची. कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुळशीच्या लग्नाला सुरुवात होेते. कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचं लग्नाचा मोसम सुरु असतो. यंदा १५ नोव्हेंबर २०२१ रोजी तुळशीच्या लग्नाला सुरुवात होत आहे.(Tulsi Vivah 2021) तुळशीचं लग्न कसं करावं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आज आम्ही देणार आहोत. जाणून घेऊया तुळशीच्या लग्नाचा संपूर्ण विधी(Tulsi Vivah).
कार्तिकी एकादशीला सर्व मंगलकार्यांची सुरुवात केली जाते. तुळशीचं लग्न केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. तुळशीचं लग्न संध्याकाळी केलं जातं.
तुळशी विवाहासाठी साहित्य: उपलब्ध फळं, मंडप तयार करण्यासाठी ऊस, भगवान विष्णूची मूर्ती, तुळशीचे रोप, धूप, दिवा, कपडे, हार, झेंडूचे फुले, श्रृंगार साहित्य, हळद, ओढणी किंवा लाल रंगाचे वस्त्र, ओटी भरण्यासाठी साडी, चोळी, नथ, दागिने घालावे. मंगळसूत्र, जोडवी, खण-नारळ, मध, तीळ, एक कप दूध.
तुळशी विवाह मुहूर्त: एकादशी तिथी प्रारंभ -१५ नोव्हेंबर २०२१ सकाळी ०६.३९ वाजता
एकादशी तिथी समाप्ती – १६ नोव्हेंबर २०२१ सकाळी ०८.०१ वाजता
१५ नोव्हेंबर तुळशी विवाह मुहूर्त – दुपारी १.१० वाजल्यापासून दुपारी ३.१९ वाजेपर्यंत
[read_also content=”‘त्यांना देशभक्तीचा वसा संघ शाखेतून प्राप्त झाला’ सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवशाहीरांना श्रध्दांजली https://www.navarashtra.com/maharashtra/sarsanghchalak-mohan-bhagwat-pays-homage-to-shivshahir-nrkk-202386.html”]
तुळशी विवाह पद्धत
दिवाळी झाल्यानंतर दरवर्षी तुळशीचे लग्न थाटामाटात लावले जाते. घराच्या अंगणामध्ये असणाऱ्या तुळशी वृंदावनाला सजवण्यात येते. तुळशी वृंदावन, तसेच कुंडी रंगवून त्यावर राधा-कृष्णाचे चित्र काढण्यात येते. तुळशीच्या रोपट्याभोवती ओढणी किंवा लाल रंगाचे वस्त्र चढवण्याचीही पद्धत आहे. तुळशी विवाहाला अंगणात सुंदर रांगोळीही काढण्यात येते.
काही जण तुळशीच्या रोपट्याला साडी देखील नेसवतात.तुळशीला नवरीसारखे सजवण्यात येते. तुळशीची गौरीप्रमाणे पूजा करतात. तिला साडी, चोळी, नथ, सोन्याचे दागिने घालतात. सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची जोडवी, खणा-नाराळाने ओटी भरतात. मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण लावा व मंडप लावा. चार पुरोहितांकरवी गणपती-मातृका पूजा करा. तुळशीला आणि शाळीग्रामला हळद लावावी. बनवलेल्या मंडपावरही हळदीची पेस्ट लावावी. लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुलसीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवावी. यजमानाने म्हणून श्रीकृष्णाची पत्नीसोबतची मुर्ती उत्तराभिमुख आसनावर ठेवावी. गोरज मुहूर्तावर वराचे पूजन करावे. मंत्रोच्चारासहित कन्येस (तुळशीस) दान करावे. यानंतर हवन व अग्नीभोवती सप्तपदी पूर्ण करावी. नंतर वस्त्र व आभूषणे घालावित. नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करावे. शेवटी बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टकांनी विवाह लावावा.
तुळशीचा विवाह केल्याने भगवाण विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होतात. एका कथेनुसार तुळस ही लक्ष्मीचे तर भगवान विष्णूने शाळीग्रामचे रुप धारण केले होते.या दिवशी विष्णूचा शाळीग्राम अवतार आणि तुळशीची साग्रसंगीत आरती करावी. इतर देवांचीही आरती करावी. देवाला नैवेद्य दाखवावा. देवाला फक्त सात्त्विक गोष्टी, पदार्थांचाच नैवेद्य दाखवला जातो, हे अवश्य लक्षात ठेवावं.