UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारताच्या 4 ठिकाणांचा समावेश!
उदयगिरी लेणी
मध्य प्रदेशच्या उदयगिरी गुफा या अत्यंत प्राचीन आणि इतिहासकालिन मानल्या जातात. इथे वीस खडकात कोरलेल्या लेण्या पाहायला मिळतात. या गुफांमध्ये जुन्या मूर्त्या, शिलालेख आहेत. गुफांच्या आजूबाजूचा परिसरदेखील पाहायला फार छान आहे. या गुफांना चाैथ्या आणि पाचव्या शतकाच्या आसपास बांधल्याचे सांगितले जाते. येथील प्राचीन कोरीवकाम आणि लेण्यांची वास्तुकला त्यांना अद्वितीय बनवते.
बाग लेण्यांमधील चित्रे
मध्य प्रदेशच्या वाघ लेण्या या विंध्य पर्वतरांगांमध्ये बागनी नदीजवळ वसलेल्या आहेत. इथे खडकाला कापून ९ बाैद्ध गुफा तयार करण्यात आल्या आहेत. या गुफांची खासियत म्हणजे इथल्या भिंतींवर प्राचीन चित्रे रेखाटण्यात आले आहेत. या चित्रांमध्ये त्याकाळातील जीवनाची एक झलक दाखवण्यात आली आहे. लोकांच्या पेहराव्यापासून ते नाचगाण्यापर्यंत अनेक गोष्टी या चित्रातून पाहता येतात. यामुळेच वाघ गुफा फार खास मानल्या जातात.
गिन्नौरगड किल्ला
मध्य प्रदेशमधील गिन्नौरगड किल्ल्याचाही युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. हा किल्ला जुन्या काळातील राजगोंड शासकांचे प्रमुख स्थळ होता. डोंगराळ भागात बांधलेला हा किल्ला आपल्या प्राचीन इतिहासासाठी ओळखला जातो. किल्ल्याच्या आजूबाजूचे दृष्य देखील पाहण्याजोगे आहे. या ठिकाणी राजगोंड शासकांची माहिती जाणून घेता येते.
चंबळ खोऱ्यातील मंदिरे
मध्य प्रदेशातीलच चंबल खोऱ्यात तीन प्राचीन मंदिरांचा समूह पाहायला मिळते. या मंदिरांचे नाव बटेश्वर, पाडावली आणि काकरमठ असे आहे. या मंदिरांच्या भिंतीवर अत्यंत बारीक आणि सुबक नक्षीकाम करण्यात आले आहे. हे प्राचीन मंदिर त्याकाळातील कला बांधकाम पद्धतींची झलक दाखवून देतात. आता या तीनही मंदिरांचा युनेस्कोच्या टेंटिटिव्ह लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे.
Travel News : उत्तराखंडमधील अनोखे मंदिर, इथे देवाला चिठ्ठी लिहायला दूरदूरवरून येतात भाविक
महात्मा गांधींच्या सत्याग्रहाशी जोडलेले ठिकाण
या लिस्टमध्ये महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाशी संबंधित स्थळांसाठी एक विशेष प्रस्ताव देखील समाविष्ट आहे. यात एकूण ९ ठिकाणे, ज्यातील २ दक्षिण आफ्रिकेतील तर ७ भारतातील ठिकाणे आहेत. गांधीजींनी आपल्या जीवनकाळातील २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली. यादरम्यानच सत्याग्रहाची सुरुवात झाली. भारतात परतून त्यांनी ही चळवळ पुढे नेली. या प्रस्तावात साबरमती आश्रम, मणि भवन, गांधी स्मृती आणि सेवाग्राम यांचा समावेश आहे.






