मागील बऱ्याच वर्षांपासून अश्वगंधाचा (Ashwagandha) वापर आयुर्वेदामध्ये केला जात आहे. ही एक औषधी वनस्पती असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अश्वगंधाचा वापर केस, त्वचा, तणाव, थकवा, हाडांच्या वेदना यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी केला जातो. हजारो वर्षांपासून अश्वगंधाच्या पानाचा आणि मुळांचा वापर औषध उपचारांसाठी केला जात आहे. अश्वगंधा हे केवळ केसांच्या आरोग्यासाठी चांगले नसून त्याचा वापर इतरही गोष्टींसाठी केला जातो. केसांची ताकद आणि चेहऱ्यावरील सुंदरता वाढवण्यासाठी अश्वगंध वापरले जाते. या वनस्पतीपासून अनेक गंभीर आजार बरे करता येतात. अश्वगंधामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे आढळून येतात. पण अश्वगंधाचा वापर इतर आजार बरे करण्यासाठी केला जातो हे फार कमी लोकांना माहित आहे. चला तर जाणून घेऊया अश्वगंधाचे फायदे.
अश्वगंधाचे फायदे:
हृदयाचे आरोग्य सुधारते:
हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी अश्वगंधा फायदेशीर आहे. यामुळे उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. तसेच अश्वगंधाचा वापर हृदयाचे संरक्षण करण्यासाठी केला जात आहे. अश्वगंध मध्ये असलेल्या गुणकारी पोषक तत्वानामुळे याचा वापर केला जातो. छातीचे दुखणे कमी करण्यासाठी आणि हृद्यविकराच्या झटक्यापासून वाचण्यासाठी अश्वगंधाचा वापर केला जातो. त्यामुळे अश्वगंधाचा वापर हृदयरोगावर प्रभावी आहे.
[read_also content=”पांढरे केस काळे करण्यासाठी केसांना लावा अंजीर हेअर मास्क https://www.navarashtra.com/lifestyle/apply-fig-hair-mask-on-hair-to-turn-white-hair-black-nrsk-535792.html”]
अल्झायमर रोखण्यासाठी फायदेशीर:
अश्वगंधामध्ये न्यूरोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म आढळून आले आहेत. त्यामुळे अल्झायमरपासून वाचण्यासाठी अश्वगंधा फायदेशीर आहे. अल्झायमर रोगाचा वेग कमी करण्यासाठी अश्वगंधा फायदेशीर आहे. हंटिंग्टन आणि पार्किन्सन सारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांपासून सरंक्षण करण्यासाठी अश्वगंधाचा वापर केला जातो.
कर्करोगविरोधी गुणधर्म:
कर्करोगाचा त्रास असलेल्या रुग्णांना तणाव, चिंता आणि थकवा जाणवतो. या समस्येवर आराम मिळवण्यासाठी अश्वगंधा उपयोगी आहे. अश्वगंधा हा गैर-औषधी पर्याय म्हणून वापरला जातो. कर्करोगापासून दूर ठेवण्यास अश्वगंधा फायदेशीर आहे.
[read_also content=”डॉक्टरांनीं सांगितले शरीरात व्हिटॅमिन डी कमी होण्याचे कारण, अशा प्रकारे व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होईल https://www.navarashtra.com/lifestyle/vitamin-d-deficiency-is-highly-incresing-read-the-causes-provide-by-doctor-537093.html”]
चिंता-तणाव दूर राहतो:
अश्वगंधाचा 240 मिलीग्राम घेतल्याने अश्वगंधापासून आराम मिळतो. अश्वगंधा पूरक आहार घेणाऱ्या लोकांमध्ये प्लॅसिबो घेणाऱ्यांपेक्षा तणावाची पातळी कमी करतो. कोर्टिसोलची पातळी कमी करण्यास अश्वगंधा फायदेशीर आहे. अश्वगंधामुळे मेंदूच्या आरोग्याला चालना देऊन चिंता आणि नैराश्याच्या लक्षणांशी लढण्यास मदत होते.