लग्न झाल्यानंतर पतीपत्नीच्या नात्यामध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या करणामुळे भांडण ही होताच असतात. त्यांच्यामध्ये अनेक मतभेद होत असतात. काही वेळेस हे मतभेद वाढल्यानंतर पती पत्नीमध्ये रुसवा निर्माण होतो. भांडण झाल्यानंतर रागावलेल्या पत्नीला मनवण्यासाठी पतीला अनेक प्रयत्न करावे लागतात. जर योग्य पद्धतीने पत्नीचे सांत्वन नाही केले तर वाद वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शांतपणे भांडण सोडवली पाहिजेत. नात्यामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न करावे लागतात. तेव्हाच ते नातं फुलत. रागावलेल्या पत्नीचे सांत्वन करण्यासाठी तुम्ही या पद्धती वापरू शकता. यामुळे रागावलेल्या पत्नीचा रुसवा कमी होईल.(फोटो सौजन्य – iStock)
रागावलेल्या पत्नीचे सांत्वन करण्यासाठी ‘या’ पद्धती वापरा:
शांतता संयम बाळगावा:
रागावलेल्या पत्नीचा रुसवा घालवण्यासाठी तिच्या सोबत शांतपणे बोलावे, जेणेकरून आणखीन वाद वाढणार नाही. शांतपणे बोलल्यानंतर अनेक प्रश्न सुटतात. त्यामुळे सगळ्यात आधी धीर धरून शांत राहावे. मोठ्या आवाजात किंवा रागामध्ये बोलल्यानंतर अनेक नवीन समस्या वाढतात. शांत राहून पत्नीच्या रागाचे कारण समजून घेऊन मगच बोलावे.
[read_also content=”स्मरणशक्ती वाढवण्यासाठी किचनमध्ये असणारा ‘हा’ पदार्थ आहे गुणकारी https://www.navarashtra.com/photos/health-benefits-of-eating-cardamom-545260.html”]
मन मोकळेपणाने संवाद साधा:
पत्नीसोबत बोलताना शांत आणि मनमोकळेपणाने संवाद साधावा. बोलल्यानंतर अनेक समस्या सुटतात. पत्नीसोबत बोलून तिच्या रागवण्याचे कारण जाणून घ्यावे. तिचे लक्षपूर्वक ऐकून तिच्या भावना समजून घ्याव्या.
माफी मागावी:
पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर रागात तिला काहीपण बोलून जातो. त्यामुळे चूक झाल्यानंतर लगेच पत्नीची माफी मागावी. मनापासून माफी मागितल्यानंतर तुम्ही तुमची चूक मान्य करत आहात, असे दिसून येईल.
[read_also content=”यंदाचा फादर्स डे बनवा आणखीन स्पेशल, वडिलांना ‘या’ ठिकाणी नेऊन विकेंड करा खास https://www.navarashtra.com/lifestyle/visit-this-place-on-fathers-day-with-your-dad-545600.html”]
पत्नीबद्दल प्रेम आपुलकी दाखवा:
लग्न झाल्यानंतर पती पत्नीच्या नात्यातील प्रेम संपत असे अनेकांना वाटते. पण असे नसून जर नात्यात प्रेम आणि आपुलकी असेल तर ते नाते आणखीन खुलत जाते. मिठी मारणे, हात पकडणे किंवा प्रेमळ शब्द बोलणे यांसारख्या छोट्या गोष्टीने तुम्ही पत्नीचा रुसवा घालवू शकता.