जेवण बनवताना चुकूनही नका करू 'या' तेलाचा वापर, कॅन्सरच्या विळख्यात आपोआप अडकले जाल
रोजच्या जेवणासाठी आपल्याला कुकिंग ऑईलची गरज भासत असते. अनेकदा बाजारात आपल्याला अनेक प्रकारचे खाद्यतेल दिसतात. पण यातील सर्वच काही आपल्या शरीरासाठी चांगले नसतात. त्यातही अनेक जणांना तेलकट खाण्याची जास्त सवय असते, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की स्वयंपाकाचे तेल कॅन्सरला आमंत्रित करू शकते तर. हे असे लिहिण्याचे कारण म्हणजे नुकतीच जारी झालेली अमेरिकेतील स्टडी.
तुम्ही स्वयंपाकासाठी वापरत असलेले स्वयंपाकाचे तेल कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते. अमेरिकन सरकारने केलेल्या अभ्यासात हा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. याचा तरुणांना सर्वाधिक धोका असण्याची शक्यता आहे.
दारूचे किती प्रमाण पोटात गेल्यावर तुम्ही ठरते ‘बेवडे’, तुम्ही पक्के दारूबाज तर नाही ना? कसे ओळखाल
मेडिकल जर्नल गटमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे म्हटले आहे की सूर्यफूल, द्राक्ष बियाणे, कॅनोला आणि कॉर्न यांसारख्या बियाण्यांपासून बनवलेल्या तेलांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने कॅन्सरचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत खाद्यतेलाची निवड काळजीपूर्वक करणे हे खूप महत्वाचे आहे.
या अभ्यासात कोलन कॅन्सरच्या 80 रुग्णांवर संशोधन करण्यात आले, ज्यांच्यामध्ये बायोअॅक्टिव्ह लिपिड्सचे प्रमाण जास्त होते. या संशोधनात असे आढळून आले आहे की सीड ऑईलच्या ब्रेकडाउनमुळे त्यांच्यातील बायोअॅक्टिव्ह लिपिड्स वाढतात. संशोधनात 30 ते 85 वर्षे वयोगटातील 81 ट्यूमरचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये, सीड्स ऑईल हे कॅन्सरच्या ट्यूमरमध्ये हाय लेव्हल लिपिडचे कारण आहे.
यापूर्वीच्या संशोधनातही सीड्सच्या ऑईलचे आरोग्यावर घातक परिणाम आढळून आले होते. यामुळे शरीरात जळजळ होऊन कॅन्सरचा धोका वाढू शकतो. हे ऑईल शरीराला ट्यूमरशी लढण्यापासून रोखू शकतात. मात्र, यावर अजूनही संशोधन सुरू आहे.
1900 च्या दशकात, मेणबत्ती निर्माता विल्यम प्रॉक्टरने साबणामध्ये प्राण्यांची चरबीसाठी बियाण्यांपासून तेल वापरले. काही वेळातच, अमेरिकन लोकांनी या तेलाचा आहारात समावेश केला. या तेलात ओमेगा-6 आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतात. संशोधनात असे दिसून आले आहे की या तेलाच्या अतिसेवनाने जळजळ आणि कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
जर तुम्ही हेल्दी आहार घेतला तर तुम्ही ऑलिव्ह ऑईल किंवा सूर्यफूलाचे तेलासारखे हलके तेल निवडू शकता. शेंगदाणे किंवा सोयाबीनचे तेल एखादा पदार्थ तळण्यासाठी चांगले असू शकते. स्वयंपाकासाठी ऑलिव्ह ऑइल हा उत्तम पर्याय असू शकतो. जर तुम्हाला चव आणि सुगंध हवं असेल तर तुम्ही तीळ किंवा खोबरेल तेल वापरू शकता.