Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जशी भुललीस तू, तुले चोरून पाहीन मी !!

प्रेमात पडलेल्यांसाठी स्पर्श असतो एक भाषा... एक संवाद... एक आश्वासन... एक आनंद... आणि एक समाधान. अर्थात तेव्हा तो म्हणतो, "कुणी जर तर झेडले हृदयाचे, तुझेच गाणे गायीन मी, जरी भुललीस तू मले, तुले चोरुन पाहिन मी..!"

  • By Anjali Awari
Updated On: Feb 14, 2022 | 12:23 PM
As soon as you forget, I will see you stealing !!

As soon as you forget, I will see you stealing !!

Follow Us
Close
Follow Us:

संदीप नंदनवार
भंडारा :
“तुह्या गावावरुन गं, जवा जवा जाईन मी,
जरी भुललीस तू मले,   तुले चोरुन पाहिन मी”

अशा युवकांच्या उत्कट भावेनेतून मराठीतून “ईश्श” म्हणून प्रेम करता येत, उर्दूमध्ये “ईष्क” म्हणून प्रेम करता येत, व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येत, कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी, प्रेम करता येत ! “लव्ह” हे त्याचेच दुसर नेम असत,
कारण….. “प्रेम म्हणजे…. प्रेम म्हणजे… “प्रेम” असत! तुमच आमच अगदी “सेम” असत……”
मंगेश पाडगावकरांच्या या ओळी ऐकताना मनात लगेचच विचार येतो, तो  म्हणजेच १४ फेब्रुवारीचा. अरे असे काय करताय ? गोड, गुलाबी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी हा एक हक्काचा दिवस !

शाळेचा गणवेश आणि दप्तरांची ओझी या सगळ्यांपासून मुक्त झाल्यानंतर आपण महाविद्यालयात एका मुक्त आणि धुंद वातावरणात प्रवेश केल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच कुणीतरी “आपल” असावं, अस वाटायला लागतं.
“कशाला वाचला चेहरा, पुस्तके वाचणाऱ्याने,
उभा रस्ता बदलला रे, तिच्या एका इशाऱ्याने”

या हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोड शिरशिरीतूनच मग प्रेमात पडावसं वाटतं. एकदा का प्रेमात पडल, की प्यार का ईजहार करण ओघान आलच ! हे प्रेम विझून जाता ते व्यक्त व्हाव, फुलत जाव, यासाठीच दरवर्षी १४ फेब्रुवारीला साजरा होतो – व्हॅलेंटाईन डे ! संपूर्ण जगातील समस्त प्रेमिकांचा हक्काचा वाटणारा गुलाबी स्वप्नांचा गोड दिवस !
[read_also content=”Unique Symbol of Love in Chandrapurप्रेमाचे प्रतीक : राणी हिराईने ३१७ वर्षापूर्वी उभारलेली राजा बीरशहाची भव्य दिव्य समाधी देतेय पतीच्या प्रेमाची अतूट साक्ष https://www.navarashtra.com/chandrapur/vidarbha/chandrapur/symbol-of-love-a-magnificent-divine-tomb-of-king-birshah-built-by-rani-hirai-317-years-ago-testifying-to-her-husbands-unconditional-love-nraa-237731.html”]

हा दिवस का साजरा केला जातो, या विषयी अनेक दंतकथा आहेत. पण, महाविद्यालयीन युवक्-युवतींमध्ये १४ फेब्रुवारी या दिवसाला विशेष महत्व दिल जात. जुन्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षात पदार्पण केल, की जानेवारी महिन्याच्या मध्यावरच सर्व तरुणाईला वेध लागतात ते १४ फेब्रुवारीचे. मैत्रीच रुपांतर प्रेमात व्हाव, ह्यासाठी धडपडणाऱ्यासाठी आतापर्यंत मूक असलेल्या या अनोख्या तारुण्यसुलभ भावनेला व्यासपीठ मिळत.  ते या दिवसाच्या रुपाने ! ईतर वेळी मनातील भावना आवडत्या व्यक्तीशी मांडण्यास घाबरणाऱ्या तरुण्-तरुणींसाठी हा दिवस म्हणजे सुवर्णसंधीच असते ! शिवाय जे अगोदरच या प्रीतीच्या रेशीमगाठींनी बांधले गेलेले असतात, ते आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीला खुश करण्यासाठी याच दिवसाचा आधार घेतात.

“जवा या जिंदगानीची,
उघडली फाटकी पाने,
मनाला मारला रफ्फू,
तिच्या एका इशाऱ्याने ”

अशा अनेक काव्यपंक्ती महाविद्यालयीन तरुण युवा पुटपुटत असतात. वी आर गोईंग आराउण्ड…… त्यांची लव्हशिप चालु आहे… म्हणजेच अफेअर आहे… आणि एकदम गावरान भाषेत बोले तो लफड…. तर ते प्रेमात आहेत. अर्थात आपल ते प्रेम दुसऱ्याचा ते लफडं..असो…. . भेटण…. भटकण चालु आहे. कॉलेजला बंक मारुन थियेटरमध्ये कोपऱ्यातल्या सीटच तिकीट काढून सिनेमा बघण्याची गंमत दुसऱ्या  कुणालाच समजू शकणार नाही. तिचा आश्वासक हात हातात असतो तेव्हा जग जिंकल्याची भावना त्याच्या मनात असते आणि त्यान समजून घेत तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला जवळ घेतल की प्रेमाखातर सगळ्या जगाशी लढण्याच बळ तिच्यात संचारत.

[read_also content=”भंडाराविदेशी पाहुण्यांचा साकोली परिसरात किलबिलाट https://www.navarashtra.com/bhandara/vidarbha/bhandara/the-chirping-of-foreign-visitors-in-the-sakoli-area-nraa-237496.html”]

स्पर्शातली खरी जादू प्रेमात पडलेल्यांना माहीत असते. बाकीच्यांसाठी असतात अनेक निरर्थक स्पर्श जे कळत नकळत होत असतात. पण प्रेमात पडलेल्यांसाठी स्पर्श असतो एक भाषा… एक संवाद… एक आश्वासन… एक आनंद… आणि एक समाधान. अर्थात तेव्हा तो म्हणतो, “कुणी जर तर झेडले हृदयाचे, तुझेच गाणे गायीन मी, जरी भुललीस तू मले, तुले चोरुन पाहिन मी..!”

मग त्याचा आणि तिचा एकही दिवस एकमेकांना भेटल्याशिवाय जात नाही. रात्री झोपताना एसेमेस केल्याशिवाय डोळ्याला डोळा लागत नाही. हजारदा “आय लव्ह यू” म्हटल तरी पुन्हा एकदा म्हणावस वाटतच रहात. शहरापासून कुठेतरी दूर भटकायला जाव, मग धो धो पाऊस कोसळावा, त्या पावसात चिंब भिजाव. ओले झाल्यानेच एकमेकांना बिलगून बाईकवर बसून अंगाला झोंबणार वार सोसत सुसाट वेगान शहराबाहेरच्या घाटाला तुडवाव….. ‘रुप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना, भूल कोई हमसे ना हो जाए…’ म्हणत आपलाही पाय घसरावा…

[read_also content=”अवैध वाहतूक करणारा रेती तस्करीचा ट्रॅक्टर कुणाच्या मालकीचा, कधी निघेल पंचनाम्याचा मुहूर्त ? https://www.navarashtra.com/bhandara/vidarbha/bhandara/who-owns-the-tractor-for-smuggling-sand-nraa-237391.html”]

प्रेम ही खरतर मनातील हळुवार भावना. प्रेम म्हणजे शेवटी काय असत हो ? आपुलकीच ना? आपण केवळ तरुण वयातच प्रेम करतो अस नाही. प्रेम ही भावना निसर्गदत्त आहे. प्रेम केवळ भिन्नलिंगी व्यक्तींनी परस्परांवर कराव, अस मुळीच नाही. माणूस आपल्या जीवनात अनेक व्यक्तींवर प्रेम करतो. आपल आपल्या आईवर प्रेम असत, वडिलांवर आपण प्रेम करतो, भावंडांवर करतो… काही काही वेळा आपल्याला त्यांचा रागही येतो. त्यांच्याशी आपली कडाक्याची भांडणे होतात. पण, याचा अर्थ आपल त्यांच्यावरच प्रेम कमी झाल अस होत नाही. आपण त्यांच्याशी भांडलो तरी कायमच वैर धरत नाही किंवा त्यांच बरवाईट व्हाव किंवा आपण कराव, अस आपल्याला वाटत नाही. तस वाटायला लागल, तर त्याला विकृती म्हणतात. हीच विकृती आज काही तरुणांमध्ये यायला लागली आहे अस दिसत. किरकोळ भांडणातून आपल्या कुटुंबियांचा खून केल्याच्या घटना वाढायला लागल्या आहेत. आता तर आपल्या प्रेमाचा स्विकार न करणाऱ्या  मुलीचा निर्घुण अंत करायची विक्रुती बळावली आहे. गेल्या काही वर्षात आपल्या आजुबाजुला घडलेल्या ह्या घटनांनी अवघ्या समाजाला हादरवून सोडल आहे.  अशा अनेक मुली दुर्देवी त्यांच्या तथाकथित प्रियकरांच्या विक्रुतीला बळी पडल्या आहेत. प्रेमभावनांच्या या अतिरेकाचा सर्वच थरातून निषेध झाला….. पण फक्त निषेधच.

प्रेमासारख्या हळुवार विषयावरुन एवढी भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा विचारही कोणाच्या मनात पूर्वी आला नसेल. आपण ज्या व्यक्तीवर मनापासुन प्रेम करतो, तिने भले आपल्या प्रेमाचा स्वीकार केला नाही, तरी तिच जीवनच संपविण्याचा विचार आपण कसा काय शकतो ? सगळ्यांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा. केवळ अशी विक्रुती मनात न बाळगण्याची शपथच घ्यायला हवी अस नव्हे, तर अशा चुकीच्या मार्गाने जाणाऱ्याला योग्य दिशाही दाखवायला हवी. १७ ते ३५ वयोगटातील तरुणांच मत ! मात्र, या आधीच्या पिढीतील बहुतेकांच्या मते किंवा आत्ताच्या पिढीतील स्वतःला संस्कृतीरक्षक म्हणविणाऱ्यांच्या मते हा व्हलेन्टाईन्स डे म्हणजे स्व-संस्कृती, अस्मिता विसरत चाललेल्या आम्ही केलेल पाश्चात्त्यांच अंधानुकरण आहे.

[read_also content=”आमदार राजू कारेमोरे का गाळताहेत जीममध्ये घाम, या कृत्यातून कशाच्या बळकटीकरणाचे संकेत ? https://www.navarashtra.com/bhandara/vidarbha/bhandara/why-mla-raju-karemore-is-sweating-in-the-gym-what-a-sign-of-strengthening-on-this-occasion-nraa-236550.html”]

जर्रजर्र झालेल शरीर, कमरेतून वाकतं.. तेव्हा आयुष्य सुरकुत्याचे सुंदर नक्षीकाम करते. डोक्यांवर केशाचे पांढरे शुभ्र आभाळ निर्माण करते. या बदलणाऱ्या ऋतूची दृष्ट लागू नये म्हणून काळवंडलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा टिट लावत, तेव्हा अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट झालेल दिसत असत.
“गरज पडणार काठीची,
लागता चाहूल साठीची,
उजळणी करेल आयुष्या,
तुझ्या ही वाटाघाटीची”
पण कुणीही काहीही म्हणाल तरी हा गुलाबी दिवस साजरा होणारच ! तेव्हा या दिवसाच्या सदुपयोगासाठी अन मनातील प्रीतीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी आपल्या सर्वांना मनापासुन प्रेमपूर्वक शुभेच्छा! कारण…..
“उधळून दे तुफान सारं,
मना मध्ये साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं,
बाणावरती खोचलेलं..!
शेवटी हेच म्हणावे लागेल
“प्रेम म्हणजे…. प्रेम म्हणजे… प्रेम असत, तुमच आणि आमच अगदी “सेम” असत.

Web Title: As soon as you forget i will see you stealing nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2022 | 12:22 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.