Valentines-Week-2023
फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. याच महिन्याच्या 14 तारखेला जगभरात ‘व्हॅलेंटाइन डे’ (Valentine’s Day 2023) साजरा केला जातो. आपल्या जोडीदारासोबत डेटवर जाऊन, एखाद्याविषयीचं प्रेम व्यक्त करून किंवा ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, त्याच्यासाठी काहीतरी खास गोष्ट करून कपल्स हा दिवस साजरा करतात. व्हॅलेंटाइन डे जरी 14 फेब्रुवारीला असला तरी प्रेमाचं सेलिब्रेशन हे आठवडाभराआधीच होतं. आजपासून म्हणजेच 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीकची (Valentine Week 2023) सुरुवात झाली आहे. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे आणि किस डे असे पुढील सात दिवस हे सेलिब्रिशेन सुरू असणार आहे.
7 फेब्रुवारी- रोझ डे (Rose Day) – व्हॅलेंटाइन वीकची 7 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. आजचा दिवस रोझ डे म्हणून साजरा केला जातो. यादिवशी आपल्या जोडीदाराला, आवडत्या व्यक्तीला किंवा गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंडला गुलाबाचं फूल देऊन प्रेम व्यक्त करतात.
8 फेब्रुवारी- प्रपोज डे (Propose Day) – रोझ डेच्या दुसऱ्याच दिवशी प्रपोज डे साजरा केला जातो. आपल्या हृदयातील प्रेम व्यक्त करण्याचा हा खास दिवस आहे. एखाद्या व्यक्तीसमोर तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा चांगला दिवस आहे.
9 फेब्रुवारी- चॉकलेट डे (Chocolate Day) – व्हॅलेंटाइन वीकमधला हा तिसरा दिवस आहे. यादिवशी एकमेकांना चॉकलेट देऊन प्रेम व्यक्त केलं जातं. चॉकलेटच्या गोडव्याने नात्यांमधील कटुता कमी व्हावी हा उद्देश असतो.
10 फेब्रुवारी- टेडी डे (Teddy Day) – यादिवशी एखादा टेडी किंवा सॉफ्ट टॉय जोडीदाराला भेट म्हणून देण्याची पद्धत आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातली ही छोटीशी भेट त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते.
11 फेब्रुवारी- प्रॉमिस डे (Promise Day) – व्हॅलेंटाइन वीकच्या पाचव्या दिवशी एकमेकांना ‘प्रॉमिस’ देतात एकमेकांची कायम साथ देण्याचे किंवा सुखदु:खाच्या काळात एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहण्याचे प्रॉमिस तुम्ही या दिवशी देऊ शकता. तुमच्याकडून दिलं जाणारं छोटंसं आश्वासन जोडीदाराला आनंद देऊ शकतं.
12 फेब्रुवारी- हग डे (Hug Day) – तुम्ही कायम तुमच्या जोडीदारासोबत कायम असाल आणि भावनिक दुरावा असलाच तर तो कमी करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल याचं आश्वासन ‘हग डे’ देतो.
13 फेब्रुवारी- किस डे (Kiss Day) – व्हॅलेंटाइन डेच्या एक दिवस आधी ‘किस डे’ साजरा केला जातो. जोडीदारावर प्रेम करण्यासाठीचा हा हा दिवस आहे.
14 फेब्रुवारी- व्हॅलेंटाइन डे (Valentine Day) – 14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. जोडीदारासोबत डेटवर जाऊन, भेटवस्तू देऊन एकत्र चांगला वेळ घालवून किंवा सरप्राइज देऊन हा दिवस साजरा केला जातो.