आज मूलांक 4 आणि 6 असणाऱ्यांना गुंतवणुकीच्या बाबतीत सावधानगिरी बाळगावी लागेल नाहीतर तुमचे पैसे डुबू शकतात. मूलांक 2 असणाऱ्यांचा आजचा दिवस चांगला जाईल. जर तुम्ही तुमची नोकरी बदलायची असेल तर दिवस चांगला आहे. अंकशास्त्रानुसार, 1 ते 9 मूलांक असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊया.
( फोटो सौजन्य- freepik)
मूलांक 1
मूलांक 1 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. पैसे गुंतवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही जिथे तुमचे पैसे गुंतवाल तिथे भविष्यात तुम्हाला त्याचा चांगला लाभ मिळेल. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. आज कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी जाऊ शकता. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला जाईल. तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये तुमचा जोडीदार तुमच्यासोबत असेल.
[read_also content=”डोंबिवलीतील केमिकल कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल https://www.navarashtra.com/maharashtra/a-severe-fire-broke-out-at-a-chemical-company-in-dombivli-nrka-546604.html”]
मूलांक 2
मूलांक 2 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. पैशाच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे. आज तुमची पैशाशी संबंधित चिंता संपताना दिसेल. नोकरदार वर्गासाठी दिवस चांगला आहे. जर तुम्ही नोकरी बदलत असाल, तर दिवस चांगला आहे. तुम्हा यावर विचार करू शकता. तुमचे कौटुंबिक जीवन चांगले राहील. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.
मूलांक 3
मूलांक 3 असलेल्या लोकांचे नशीब आज पूर्णपणे अनुकूल आहे. तुमच्या माहितीपूर्ण शब्दांचे खूप कौतुक होईल. पैशाच्या दृष्टीने वेळ चांगला आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून दिवस चांगला आहे. आज तुम्हाला व्यवसायात वाढीच्या काही नवीन संधी मिळतील आणि त्या स्वीकारणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबात आजचा दिवस सामान्य आहे. कुटुंबातील सदस्यांशी मजबूत संबंध राहतील. तुमच्या जोडीदारासोबत आजचा दिवस आनंददायी जाईल.
मूलांक 4
मूलांक 4 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस नेहमीपेक्षा वाईट आहे. पैसांच्या गोष्टींसाठी आजचा दिवस अनुकूल नाही. विचार न करता पैसे गुंतवू नका. व्यवसायामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना वडिलांचा सल्ला घ्या यामुळे तुमच्या समस्या दूर होतील. कौटुंबिक जीवनात आजचा दिवस सामान्य आहे. कुटुंबातील सदस्यासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात, त्यामुळे शांत राहा आणि रागावू नका. तुमच्या जोडीदारासोबत आजचा दिवस सामान्य आहे.
मूलांक 5
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस खूप चांगला आहे. पैसे गुंतवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. विविध स्त्रोतांकडून पैसे येत राहतील. तुमच्या सर्व व्यावसायिक चिंता संपल्या आहेत. तुम्ही एखाद्याच्या भागीदारीत काही नवीन काम सुरू करू शकता, ज्यामुळे तुमच्या व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतात. नोकरदार वर्गाबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचा पगारही वाढू शकतो. आजचा दिवस कुटुंबासोबत प्रेमाने घालवला जाईल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
मूलांक 6
मूलांक 6 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज तुम्हाला अनावश्यक गोष्टींमध्ये अडकला आहात असे वाटेल. पैशाच्या दृष्टीने दिवस अनुकूल नाही. गुंतवणूक टाळा. व्यवसायासाठी आजचा दिवस सामान्यपेक्षा कमी आहे. व्यवसायात फायदा होताना दिसत नाही. आजचा दिवस कुटुंबासोबत सामान्य आहे. तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतो, त्यामुळे शांत राहा आणि सौम्य भाषा वापरा.
मूलांक 7
मूलांक 7 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. तुमचा स्वभाव सकारात्मक असेल. तुम्हाला उत्साह वाटेल. पैशाच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे. पैसा येऊ शकतो. व्यवसायासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यवसायामध्य़े प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. कुटुंबासोबत आजचा दिवस आनंदात जाईल. आज तुमच्या जोडीदाराशी प्रेमाने वागा, ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. एकूणच, आजचा दिवस खूप चांगला आहे.
मूलांक 8
मूलांक 8 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. पैशाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. जर तुम्हा मालमत्ता खरेदीमध्ये पैसे गुंतवले असाल, तर तुम्हाला लवकरच आर्थिर लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. जर तुम्हाला एखाद्यासोबत भागीदारीत काम सुरू करायचे असेल, तर आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबासोबत सामान्य दिवस व्यतीत होईल. आज तुमच्या जोडीदारासोबत चांगले आणि मजबूत संबंध प्रस्थापित होतील.
मूलांक 9
मूलांक 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस नेहमीपेक्षा खराब आहे. पैसांच्या दृष्टीने दिवस सामान्य आहे. तुम्हाला पैशाची कमतरता जाणवू शकते. आज तुम्हाला व्यावसायिक बाबींमध्ये विशेष फायदा होणार नाही, ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहू शकता आणि त्यामुळे तुमचे भावांसोबत वाद होऊ शकतात, म्हणून तुम्हाला सल्ला आहे की, धीर धरा आणि कठोर शब्दांचा वापर करू नका करू. कौटुंबिक जीवन आज सामान्य आहे. तुमच्या जोडीदाराशी काही मतभेद होण्याची शक्यता आहे.