
काही गोष्टी या पिढ्यांन् पिढ्या आपण ऐकत आलेले असतो. पण अनेकदा त्यांचा अर्थ आपल्याला माहीत नसतात. या गोष्टी ऐकून अनेकांना काही अर्थ वाटत नाही, पण तरीही शतकानुशतके लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत आले आहेत. अनेक लोक या गोष्टींना अंधश्रद्धा मानतात, पण वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shastra) काही गोष्टी खूप महत्त्वाच्याही आहेत. उदाहरणार्थ, गरम तव्यावर पाणी ओतू नये, असे म्हणतात. मान्यतेनुसार आपल्या स्वयंपाकघरात देवी लक्ष्मीचा वास असतो, म्हणूनच प्राचीन काळापासून स्वयंपाकघरात काही गोष्टी करणं चुकीचं मानलं जातं.
इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा यांच्या मते, गरम तव्यावर पाणी ओतण्यास आपल्याकडे मनाई आहे. गरम तव्यावर पाणी ओतणं का चुकीचं आहे, याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.