
फोटो सौजन्य- pinterest
वास्तुशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. घरात या नियमांचे पालन केल्यास घरात सुख-समृद्धी टिकून राहते. मात्र दैनंदिन जीवनात आपल्याकडून नकळत काही चुका होतात. दैनंदिन जीवनात आपण नकळत काही अशा चुका करतो, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार घरातील या चुकांमुळे जीवनातील आर्थिक अडचणी वाढतात, त्यामुळे घरात या चुका करणे टाळावे. कोणत्या आहेत त्या चुका, जाणून घ्या
जेवण झाल्यानंतर ताटातच हात धुण्याची सवय अनेकांना असते. वास्तुशास्त्रानुसार अन्न हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. जेवण झाल्यानंतर ताटात हात धुतल्याने अन्नाचा अपमान होतो असे म्हणतात. यामुळे घरात संपत्तीचा प्रवाह रोखला जातो. त्यामुळे हात वेगळ्या जागी धुणे अधिक योग्य मानले जाते.
बंद किंवा खराब घड्याळ घरात ठेवणे हे प्रगती थांबण्याचे प्रतीक मानले जाते. वेळ ही प्रगती आणि संधीचे प्रतीक आहे. घरात बंद घड्याळ ठेवणे हे आर्थिक अस्थिरतेचे लक्षण मानले जाते. त्यामुळे घरात कधीही बंद घड्याळ ठेवू नये. असे घड्याळ त्वरित दुरुस्त करावे किंवा काढून टाकावे. घरामध्ये बंद घड्याळ ठेवल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
ज्या घरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते, तिथे सकारात्मक ऊर्जा कमी होते. यामुळे आर्थिक नुकसान होते. बेडरूम ही विश्रांती आणि सकारात्मक उर्जेची जागा मानली जाते. बेडवर घाण कपडे ठेवणे किंवा अस्ताव्यस्तपणा ठेवणे यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. याचा परिणाम मानसिक ताण आणि आर्थिक अस्थिरतेवर होऊ शकतो.
मुख्य दारातून घरात सकारात्मक ऊर्जा येत असते. त्यामुळे घराच्या मुख्य दाराजवळ घाण, तुटलेल्या वस्तू, अडगळीचे सामान ठेवू नये. या वस्तू दाराजवळ असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे मुख्य दार स्वच्छ आणि मोकळे ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच आर्थिक समस्या वाढण्याची शक्यता असते.
घरात अनेकांना सुकलेली रोपे ठेवण्याची सवय असते. पण घरात ते ठेवल्यानेयामुळे घरातील वातावरणावर नकारात्मक परिणाम होतो आणि आर्थिक अडचणी वाढू शकतात. सुकलेली रोपे त्वरित काढून टाकून ताजी, हिरवीगार रोपे लावावीत. निराशा जाणवते आणि आर्थिक अडचणी येतात.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: वास्तुशास्त्रानुसार घरातील ऊर्जा, स्वच्छता आणि वस्तूंची मांडणी यांचा मानसिकता व प्रगतीवर परिणाम होतो, अशी श्रद्धा आहे. नकारात्मक ऊर्जा वाढल्यास आर्थिक स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो, असे मानले जाते.
Ans: घर नियमित स्वच्छ ठेवणे, तुटलेल्या वस्तू दुरुस्त करणे किंवा काढून टाकणे, मुख्य दरवाजाजवळ प्रकाश ठेवणे, सकारात्मक विचार आणि शिस्त राखणे
Ans: सुकलेली किंवा कोमेजलेली रोपे निराशा आणि अडथळ्यांचे प्रतीक मानली जातात. त्यामुळे अशी रोपे त्वरित काढून टाकून हिरवीगार रोपे लावणे शुभ मानले जाते.