Gut Health: पचनक्रियेपासून बद्धकोष्ठतेपर्यंत त्रिफळा चूर्णा खाल्याने शरीराला होतील भरमसाट फायदे, जाणून घ्या सेवन करण्याची पद्ध
Gut Health: जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामांमुळे पचनक्रिया बिघडणे, बद्धकोष्ठता, पोटात वाढलेल्या वेदना इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. पचनक्रिया बिघडल्यानंतर गोळ्या किंवा इतर वेगवेगळे उपाय केले जातात. पण त्याऐवजी त्रिफळा चूर्ण खाण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेदामध्ये त्रिफळा खूप जास्त म्हत्व आहे. आवळा, हिरडा आणि बेहडा या तीन फळांपासून त्रिफळा तयार केला जातो. या तिन्ही पदार्थांमध्ये पोषक आणि वनस्पतीजन्य संयुगे आढळून येतात. पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांमध्ये त्रिफळाचा समावेश आवर्जून केला जातो. पण त्रिफळा प्रत्येक आजारावर गुणकारी ठरेलच असे नाही. त्यामुळे शरीराची प्रकृती लक्षात घेऊनच त्रिफळा खाण्याचा पर्याय निवडावा. पचनासंबधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी त्रिफळा चूर्णा पाण्यात मिक्स करून खावे. चला तर जाणून घेऊया त्रिफळा चूर्णा खाण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
बद्धकोष्ठता आणि वाढत्या अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी त्रिफळाच्या चूर्णाचे सेवन करावे. बद्धकोष्ठता, पोटात तीव्र वेदना, शौचातून रक्त पडणे इत्यादी लक्षणे दिसत असतील घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करावेत. त्रिफळ्यामध्ये आवळा असल्यामुळे अँटी ऑक्सिडंट गुणधर्म शरीराला मिळतात. शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण देण्यासाठी त्रिफळा चूर्णाचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात त्रिफळा चूर्णा मिक्स करून प्यायल्यास पचनाच्या समस्यापासून सुटका मिळेल.
शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी त्रिफळा चूर्णा फायदेशीर ठरेल. यकृत आणि मूत्रपिंड स्वच्छ करण्यासाठी त्रिफळा खाणे फायदेशीर ठरते. पण वांरवांर उपाशी पोटी त्रिफळा चूर्णाचे अजिबात सेवन करू नये. हिरड्यांना सूज येणे, रक्त येणे किंवा दात दुखणे अशा अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी त्रिफळाचा वापर करावा. हिरड्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी त्रिफळाचा वापर वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये सुद्धा केला जातो. नियमित दात घासणे, दातांमधील स्वच्छता राखणे फारच आवश्यक आहे.
बाजारात त्रिफळ्या चूर्णा सहज उपलब्ध होते. पण विकतचे चूर्णा खरेदी करताना त्यांची गुणवत्ता आणि घटक तपासून पाहणे आवश्यक आहे. पॅकवर दिलेल्या सूचनांचे पालन आणि आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्रिफळा चूर्ण प्यावे. अतिप्रमाणात सेवन केल्यास जुलाब. उलट्या किंवा पचनाच्या समस्या वाढतात. त्यामुळे कोणत्याही पदार्थाचे सेवन कराताना शरीराला सुट होईल की नाही, याची खात्री करून त्रिफळा चूर्णाचे सेवन करावे. त्रिफळा चूर्ण रात्रीच्या वेळी किंवा उपाशी पोटी घ्यावे.
Ans: त्रिफळा चूर्ण हे आवळा, हिरडा आणि बेहडा या तीन फळांपासून तयार केले जाते. आयुर्वेदात त्याचा वापर पचनाच्या तक्रारींसाठी केला जातो. मात्र, त्याचे फायदे व्यक्तीनुसार बदलू शकतात आणि ते प्रत्येक आजारावर प्रभावी ठरेलच असे नाही.
Ans: त्रिफळा चूर्णामुळे काही व्यक्तींना मलविसर्जनास मदत होऊ शकते. मात्र, बद्धकोष्ठतेसाठी त्याच्या परिणामकारकतेबाबत ठोस वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत. पुरेसे पाणी पिणे, फायबरयुक्त आहार घेणे आणि नियमित हालचाल करणेही महत्त्वाचे आहे.
Ans: त्रिफळा चूर्णाचे सेवन उत्पादनावरील सूचनांनुसार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावे. स्वतःहून मोठ्या प्रमाणात सेवन करू नये. प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य प्रमाण वेगळे असू शकते.






