fashion: दरबारी साडी म्हणजे काय? शाही लूकसाठी महिलांमध्ये वाढतेय 'या' साडीची क्रेझ; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

fashion: शाही आणि पारंपरिक लूकसाठी सध्या महिलांमध्ये दरबारी साडीची क्रेझ वाढताना दिसत आहे. राजस्थान आणि गुजरातच्या राजपुती परंपरेशी जोडलेली ही साडी आकर्षक नक्षीकाम, जरी, मीनाकारी आणि भरजरी डिझाइन्ससाठी ओळखली जाते. जाणून घ्या दरबारी साडीची खास वैशिष्ट्ये, प्रकार, किंमत आणि स्टायलिंग टिप्स.
What is a 'Darbari' (royal-style) saree?( फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
What is a 'Darbari' (royal-style) saree?( फोटो सौजन्य - सोशल मीडिया)What is a 'Darbari' (royal-style) saree?( फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 

दरबारी साडीची खास वैशिष्ट्ये कोणती ?

कोणत्या कापडात मिळतात दरबारी साड्या?

दरबारी साडीसोबत कशी करा स्टाइलिंग?

भारतीय पारंपरिक साड्यांमध्ये प्रत्येक साडीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आणि वैशिष्ट्य आहे. बदलत्या फॅशनच्या जगातही पारंपरिक साड्यांची लोकप्रियता कायम आहे. सध्या महिलांमध्ये शाही आणि आकर्षक लूक देणाऱ्या साड्यांची विशेष क्रेझ पाहायला मिळत आहे. यामध्ये दरबारी साडीचा समावेश होतो.सध्या सोशल मीडिया वर ही दरबारी साडी प्रसिद्ध होताना दिसते. राजस्थान आणि गुजरातच्या राजपुती परंपरेशी जोडलेली ही साडी तिच्या भरजरी नक्षीकामामुळे आणि सुंदर कलाकुसरीमुळे ओळखली जाते.त्याचबरोबर या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे पारदर्शकतेमुळे तसेच त्यावरील design मुळे ती जास्त आकर्षक दिसते.सण-समारंभ, लग्नकार्य किंवा इतर खास प्रसंगांसाठी ही साडी उत्तम पर्याय ठरू शकते.

दरबारी साडीची खास वैशिष्ट्ये कोणती ?

दरबारी साडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यावरील शाही नक्षीकाम. या साडीवर फुलांच्या वेली, पारंपरिक आकृत्या, राजवाड्यांची दृश्ये आणि आकर्षक डिझाइन्स पाहायला मिळतात. साडीच्या पदरावर आणि काठावर विशेष भर दिलेला असतो. अनेक साड्यांवर जरी, मीनाकारी, आरी-तारी, कटदाना, गोटा पट्टी आणि सिक्विनचे नाजूक काम केलेले असते. त्यामुळे साडीला एक वेगळाच रॉयल लूक मिळतो. बांधणी, लहरिया आणि शिबोरी यांसारख्या पारंपरिक रंगकामाचाही काही डिझाइन्समध्ये वापर केला जातो.

कोणत्या कापडात मिळतात दरबारी साड्या?

दरबारी साड्या वेगवेगळ्या प्रकारच्या कापडांमध्ये उपलब्ध असतात. रोजच्या वापरासाठी किंवा छोट्या कार्यक्रमांसाठी जॉर्जेट, शिफॉन आणि पॉली-जॉर्जेटमधील साड्या निवडता येतात. या साड्या वजनाने हलक्या असल्यामुळे नेसायला आरामदायी असतात. तर लग्नकार्य, सण आणि मोठ्या समारंभांसाठी चिनॉन, व्हिस्कोस सिल्क, आर्ट सिल्क आणि प्युअर सिल्क ब्लेंडमधील भरजरी साड्यांना पसंती दिली जाते. या साड्यांवर सुंदर जरीकाम आणि आकर्षक बॉर्डर पाहायला मिळते.

किती असते दरबारी साडीची किंमत?

दरबारी साडीची किंमत तिचे कापड, नक्षीकाम आणि डिझाइन यावर अवलंबून असते. साधारणपणे हलक्या जॉर्जेट किंवा शिबोरी प्रिंटमधील साड्या ८०० ते २,५०० रुपयांपर्यंत मिळू शकतात. तर सिल्क, चिनॉन आणि जड जरीकाम असलेल्या डिझायनर साड्यांची किंमत ४,००० रुपयांपासून १५,००० रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते.

दरबारी साडीसोबत कशी करा स्टाइलिंग?

दरबारी साडीला अधिक आकर्षक लूक देण्यासाठी पारंपरिक दागिन्यांची निवड करू शकता. यासोबत कुंदन नेकलेस, झुमके, बांगड्या आणि मांगटिका घातल्यास शाही लूक खुलून दिसतो. केसांचा अंबाडा, त्यावर गजरा आणि पारंपरिक मेकअप केल्यास तुमचा लूक अधिक सुंदर दिसेल. त्यामुळे पारंपरिकतेसोबत शाही अंदाज जपायचा असेल, तर दरबारी साडी एक उत्तम पर्याय ठरू शकते.