बटर चिकन आणि दाल माखनीचा शोध कोणी लावला
आपला भारत हा देश विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशात प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती पाहायला मिळते. भारतात प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती वेगळी असून जसजसे ठिकाण बदलते तसतसे खाण्याची चवही बदलली जाते. त्या त्या राज्याचे मसाले, भाज्या यानुसार पदार्थही बदलत जातात. मात्र काही पदार्थ असे असतात जे संपूर्ण देशभरात आवडीने खाल्ले जातात. भारतचे अनेक पदार्थ जगभर पसरेलले आहेत. मात्र या पदार्थांचा शोध नक्की कोणी लावला, हे सांगणे फार कठीण आहे. मागे दिल्लीतील दोन दोन प्रतिष्ठित रेस्टोरेंटने दोन पदार्थांचा शोध लावल्याचा दावा केला होता आणि नंतर हे प्रकरण इतकं टोकाला गेलं की हा वाद थेट हाय हायकोर्टात दाखल झाला.
दिल्लीतील मोती महल (Moti Mahal) आणि दरियागंज (Daryaganj) या प्रतिष्ठित रेस्टोरेंटने दाल मखनी आणि बटर चिकनचा शोध लावल्याचा दावा केला गेला होता. या प्रकरणात 1947 मध्ये कुंदनलाल गुजराल यांनी बटर चिकन आणि दाल माखनीचा आविष्कार केला असा दावा मोती महल रेस्टोरेंटने केला. तर या पदार्थांचा इतिहास 19व्या शतकाशी जोडला गेलाय असं दरियागंज रेस्टोरेंटचं म्हणणं आहे. या प्रकरणात यालयाने दरियागंज रेस्टॉरंटच्या मालकांना समन्स बजावले आणि वादग्रस्त विधानांपासून दूर राहण्याचा सल्ला दोन्ही पक्षांना दिला.
यांनतर दरियागंज रेस्टोरेंटने दिल्ली हायकोर्टाने धाव घेतली. या वादावर प्रतिक्रिया देत महलच्या मालकाने अपमानकराक वक्तव्य केले होते. नंतर या गोष्टीचा दरियागंज रेस्टोरेंटने कसून विरोध केला. तर मोती महालाच्या वक्तव्यामुळे आपल्या व्यवसायावर याचा परिणाम झाल्याचा दावा दरियागंज रेस्टोरंटने कोर्टात केला. तर दुसरीकडे मोती महल रेस्टोरेंटनेदेखील दरियागंज रेस्टोरेंट विरोधात कोर्टात याचिका दाखल केली. बटर चिकन आणि दाल मखनीचा शोध लावल्याचा दरियागंजचा दावा चुकीचा असून कोर्टाने त्यांच्यावर असे करण्यापासून रोख लावावी अशी मागणी मोती महल रेस्टोरेंटने केली.