शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी दहशतवादावर भाष्य केले,
गौरी पालवे या वरळी बीडीडी येथे राहत होत्या आणि केईएम रुग्णालयाच्या डेन्टिस विभागात कार्यरत होत्या. मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
मुंबई उपनगरमधील या शिबिराचा शुभारंभ जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते वांद्रे (पूर्व) येथील उत्तर भारतीय संघ सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते.
कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात टोयोटा-किर्लोस्कर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या.
Mumbai: मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल असे या टर्मिनलचे नाव आहे. यासाठी ५५६ कोटी खर्च करण्यात आले आहेत. समुद्राच्या लाटांना सामना करण्यासाठी क्रूझची रचना छतासारखी करण्यात आली आहे.
उद्योग समूहांच्या सहकार्याने आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करुन कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे, असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.
पुन्हा एकदा राज्य सरकारचे नियम धाब्यावर बसवत शाळांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. घाटकोपरमधील शाळेतील मुलांना समोसा खाऊन विषबाधा झाल्याची घटना आता समोर येतेय, नक्की काय घडले
कोल्हापूरच्या चंदगड नगरपरिषदेत काका-पुतण्याची युती झाली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने संयुक्त लढण्याची घोषणा केली आहे. चंदगड शहर पारंपारिकपणे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील पत्रकार कक्षात एआय संदर्भात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यान आले.
महाराष्ट्रातील १७ शहरांनी PM 2.5 ची राष्ट्रीय मर्यादा (४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर) ओलांडली आहे आणि सर्व शहरांमध्ये PM 10 ची पातळी 'राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकांपेक्षा अधिक आहे.
Bombay Highcourt on illegal slums : मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवण्यासाठी २०११ नंतर बांधलेल्या बेकायदेशीर झोपडपट्ट्यांवर सरकारी संस्थांनी कारवाई करावी. सरकारने या मुद्द्यावर प्रगतीशील दृष्टिकोन बाळगला पाहिजे.
रुग्णांच्या अडचणी सोडवून त्यांना सुविधा देण्याकरिता केईएममध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात दक्षता समिती स्थापन करण्यात येणार असून यात नागरिकांचा ही समावेश करण्यात येणार आहे.
कोस्टल रोडचा पुढचा टप्पा वर्सोवा ते भाईंदर असा प्रस्तावित आहे. मुंबई महानगपालिकेने हाती घेतलेल्या या प्रकल्पामुळे आता प्रवासाचा वेग कमी होणार आहे आणि प्रवास देखील सुसाट होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या निदर्शनास आले आहे की मुंबई शहर आणि उपनगरातील आरक्षित भूखंडावर 51 हजार 582 झोपड्या उभारल्या आहेत. यांचा पुनर्विकास कसा करता येईल? असा प्रश्न महापालिकेला पडला आहे.
मुंबईच्या पहिल्या थीम पार्कची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. यासाठी नक्की कोणत्या प्रकारे पावलं उचलण्यात येणार आहेत. नागरिकांनीदेखील याबाबत भाष्य केले असून अधिक माहिती जाणून घ्या