Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्त्री सक्षमीकरण ते सक्तीचं प्राथमिक शिक्षण देणारा राजा म्हणजेच ‘राजर्षी शाहू महाराज’

केवळं राजेपण न मिरवता सामाजातील प्रत्येक घटकासाठी आपला उपयोग व्हावा यासाठी शाहू महाराज अखंड आयुष्य झटत राहिले. सक्तीचं शिक्षण, स्त्री सक्षमीकरण, समानता, दिनदुबळ्यांना त्यांचे मुलभूत अधिकार मिळवून देणे, जातीव्यवस्थेतील विषमता दूर करणे अशी अनेक महान कामं महाराजांनी त्यांच्या कालखंडात पार पाडली.

  • By Aparna Kad
Updated On: May 06, 2022 | 01:08 PM
स्त्री सक्षमीकरण ते सक्तीचं प्राथमिक शिक्षण देणारा राजा म्हणजेच ‘राजर्षी शाहू महाराज’
Follow Us
Close
Follow Us:

शिक्षण महर्षी, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची आज १००वी पुण्यतीथी. समाजात एकरुपता यावी. सर्वांना शिक्षणाचा, जगण्याचा समान अधिकार मिळावा यासाठी झटणारा राजा म्हणून शाहू महाराजांची किर्ती आहे. केवळं राजेपण न मिरवता सामाजातील प्रत्येक घटकासाठी आपला उपयोग व्हावा यासाठी शाहू महाराज अखंड आयुष्य झटत राहिले. सक्तीचं शिक्षण, स्त्री सक्षमीकरण, समानता, दिनदुबळ्यांना त्यांचे मुलभूत अधिकार मिळवून देणे, जातीव्यवस्थेतील विषमता दूर करणे अशी अनेक महान कामं महाराजांनी त्यांच्या कालखंडात पार पाडली.

  • प्राथमिक शिक्षणाचा कायदा

१९०१ ते १९२२ या बावीस वर्षांच्या कालखंडात शाहू छत्रपतींनी आपल्या संस्थानात भिन्नभिन्न जातींची २३ वसतिगृहे स्थापन करून त्या त्या जातींच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोलाची मदत केली.

‘शिक्षणच आमचा तरणोपाय आहे, असं माझं ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असं इतिहास सांगतो.’ हा शाहू छत्रपतींनी शिक्षणाबद्दल मांडलेला विचार त्यांच्या शैक्षणिक धोरणावर प्रकाश टाकतो.

त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याची घोषणा करून तसे प्रयत्न केले होते. ३० सप्टेंबर १९१७ला कोल्हापूर संस्थानात मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला.

  • हरित क्रांतीची सुरवात

हरित क्रांतीची बीजे प्रथम शाहू छत्रपतींनी आपल्या कोल्हापूर संस्थानामधे १९०८-०९लाच रोवली होती. कोल्हापूर संस्थानामधे दर तीन वर्षांनी पडणार्‍या दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊनच, शाहू छत्रपतींना राधानगरी धरणाची संकल्पना सुचली असावी, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.

शेतीसंबंधी चहा-कॉफीसारखं पैशाचं पीक घेण्याचा अभिनव प्रयोग शाहू छत्रपतींनी पन्हाळा आणि भुदरगड भागात राबवलेला दिसून येतो. शाहू छत्रपतींनी आपल्या संस्थानाल्या शेतीला कायमचा पाणीपुरवठा व्हावा म्हणून पाणी पुरवठ्याच्या लहान-मोठ्या योजना कार्यवाहीत केल्या होत्या.

  • स्त्री-सक्षमीकरणासाठी पुढाकार

शाहू छत्रपतींनी विवाह, घटस्फोट, स्त्रियांवर होणारे शारीरिक अत्याचार, अनौरस संततीला मालमत्तेत हक्क अशा प्रकरणांमधे स्त्रियांना स्वातंत्र्य देणारे आणि समानतेचे हक्क देणारे अनेक कायदे करून ते कोल्हापूर संस्थानामधे अंमलात आणले होते.

कोल्हापूर संस्थानात स्त्री शिक्षणासाठी एक खास अधिकारपद निर्माण करण्यात आलं होतं. त्या पदावर फेमिल ट्रेनिंग स्कूलमधे कार्यरत असणार्‍या सौ. रखमाबाई केळवकर या बुद्धिमान आणि कर्तव्यदक्ष स्त्रीची १ सप्टेंबर १८९५ला नेमणूक केली होती.

शाहू छत्रपतींनी त्यांची सून इंदूमती राणीसाहेबांना त्यांचं पुढील आयुष्य अधिक सन्मानानं आणि सुरक्षितपणे जगता यावं म्हणून वा. द. तोफखाने यांच्या देखरेखीखाली त्यांच्या शिक्षणाची सोय केली.

 

Web Title: Women empowerment to compulsory primary education read story of king chattrapati shahu maharaj nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2022 | 01:01 PM

Topics:  

  • Rajarshi Shahu Maharaj

संबंधित बातम्या

शाहू महाराज जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप; महापुरुष जयंती उत्सव समितीचा उपक्रम
1

शाहू महाराज जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप; महापुरुष जयंती उत्सव समितीचा उपक्रम

Kolhapur News : राजर्षी शाहू महाराज न्यायनिवाडा करायचे, त्या दरबार हाॅलमध्ये सोहळा संपन्न
2

Kolhapur News : राजर्षी शाहू महाराज न्यायनिवाडा करायचे, त्या दरबार हाॅलमध्ये सोहळा संपन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.