
Brain tumor
मेंदू किंवा त्याच्या सभोवतालच्या भागातील पेशींची असामान्य वाढ म्हणजे ब्रेन ट्यूमर.त्या सौम्य (कर्करोगाच्या नसलेल्या) किंवा घातक (कर्करोगाच्या) असू शकतात, यातील दुसऱ्या प्रकारच्या म्हणजे कर्करोगाच्या पेशी निरोगी मेंदूच्या ऊतींवर आक्रमण करून त्यांचा नाश करू शकत असल्याने धोकादायक असतात.
उपचाराचे परिणाम सुधारण्यासाठी आणि न्यूरोलॉजिकल फंक्शन टिकवून ठेवण्यासाठी ब्रेन ट्यूमरचेवेळीच निदान आणि उपचार होणे महत्वाचे आहे. न्यूबर्ग अजय शहा प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह आणि सात्यकी बॅनर्जी, कार्यकारी संचालक आणि गट मुख्य कार्यकारी अधिकारी, त्रिविट्रॉन हेल्थकेअर यांचा सल्ला आपण या लेखातून जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
[read_also content=”ब्रेन ट्यूमरमुळे उद्भवते नैराश्य ताणाची समस्या https://www.navarashtra.com/lifestyle/depression-or-stress-problem-caused-by-brain-tumor-know-expert-advice-543906.html”]
प्रकार आणि लक्षणे
ब्रेन ट्यूमरचे वर्गीकरण तो कोणत्या पेशींपासून तयार होतो त्यानुसार केले जाते. प्राथमिक ब्रेन ट्यूमरची सुरूवात मेंदूमध्ये होते, तर दुय्यम (मेटास्टॅटिक) ब्रेन ट्यूमरच्या गाठी शरीराच्या इतर भागांतून पसरतात. ग्लिओमास, मेनिन्जिओमास, पिट्यूटरी एडेनोमास आणि मेडुलोब्लास्टोमास हे प्राथमिक ब्रेन ट्यूमरचे सर्वात सामान्य प्रकार आहेत.
लक्षणे ट्यूमरचे स्थान, आकार आणि वाढीचा दर यावर अवलंबून असतात आणि त्यानुसार त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक असतो, परंतु सामान्य लक्षणांमध्ये सतत डोकेदुखी, फेफरे येणे, दृष्टी किंवा ऐकण्याच्या समस्या, व्यक्तिमत्त्व किंवा वर्तनातील बदल आणि संतुलन किंवा समन्वय साधण्यात अडचण यांचा समावेश होतो.
[read_also content=”तरूणामधील ब्रेन ट्यूमर: सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळीच निदान आवश्यक https://www.navarashtra.com/lifestyle/world-brain-tumor-day-brain-tumors-in-youth-early-symptoms-and-diagnosis-needed-544450.html”]
वेळेवर निदान होण्याचे महत्व
ब्रेन ट्यूमरचे वेळेवर निदान होणे अनेक कारणांसाठी महत्वाचे आहे.सर्वप्रथम वेळेवर निदान झाल्याने कमी त्रासदायक परंतु परिणामकारक असे वेगवेगळे उपचार करणे शक्य होते.
MRI, सिटी स्कॅन या सारख्या प्रगत तंत्रामुळे ब्रेन ट्यूमर त्याच्या प्राथमिक अवस्थेत असताना लक्षात येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्याच बरोबर नॉव्हेल बायोमार्कर्स आणि जेनेटिक प्रोफाइलिंग मुळे निदानातील अचूकता वाढली आहे ज्यामुळे अधिक वैयक्तिकृत उपचार योजना करणे शक्य होते. या आधुनिक तंत्रांमुळे डॉक्टर ट्यूमर असल्याचे निदान तर करतातच पण त्याच बरोबर त्यांना त्याची होणारी वाढ आणि वेळोवेळी उपचारांना तो कसा प्रतिसाद देतो यावर देखील लक्ष ठेवता येते.
काय आहे उपाय
ब्रेन ट्यूमरच्या उपचारात सामान्यतः शस्त्रक्रिया, रेडीएशन थेरपी आणि केमोथेरपी यांचा एकत्रित वापर केला जातो. इम्युनोथेरपी आणि टारगेटेड ड्रग थेरपी यासारख्या नवीन उपचारपद्धतींमुळे देखील रुग्णांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसत आहे. हे उपचार ट्यूमर पेशींना लक्ष्य करून आपले काम करतात आणि निरोगी टिश्यूजना वाचवतात, त्यामुळे दुष्परिणाम कमी होऊन परिणामकारकता सुधारते.
ब्रेन ट्यूमरचे वेळीच निदान आणि उपचार यांचे महत्व कमी लेखून चालणार नाही. वेळेवर निदान झाल्यास परिणामकारक उपाय करता येण्याची शक्यता वाढून गंभीर न्यूरॉलॉजीकल नुकसान टाळणे एकूणच रोगनिदान सुधारणेशक्य होते. सातत्याने होत असलेली डायग्नोस्टिक तंत्र आणि उपचार पर्यायांमधील प्रगती या गंभीर आव्हानाचा सामना करणाऱ्या रूग्णांसाठी आणखी चांगल्या परिणामांचे आश्वासन देतात.