ज्योतिष शास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या जिवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो.अशा परिस्थितीत सर्व गोष्टी योग्य ठिकाणी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर पायात घातलेली चप्पलही व्यक्तीचे नशीब उजळण्यास मदत करते.चप्पलशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत, जर त्याकडे लक्ष दिले तर आर्थिक स्थिती सुधारेल.
तुटलेली किंवा जीर्ण चप्पल घरात ठेवल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. तुटलेल्या चप्पलमुळे घरात अशांतता निर्माण होते.वास्तूनुसार नेहमी वापरलेले शूज आणि चप्पल पश्चिम दिशेला ठेवावी.अनेक वेळा चप्पल काढताना चप्पल चप्पलच्या वरच राहते. चप्पलवर चप्पल असेल किंवा चप्पल उलटी झाली असेल तर ती लगेच व्यवस्थित करा. असं न केल्यास ज्या व्यक्तीची चप्पल आहे त्या व्यक्तीवर रोगांची छाया पडते.चप्पल कधीही घराच्या उंबरठ्यावर ठेवू नये.
घराच्या दारात चप्पल काढून ठेवल्याने घरात कधीही समृद्धी येत नाही. तसेच कोणाकडूनही भेट म्हणून शूज घेऊ नका.तुटलेले शूज आणि चप्पल घालणे टाळा.असं म्हटले जाते की स्वच्छ शूज आणि चप्पल परिधान केल्याने भाग्य ऊजळते.काहीतरी खात असताना शूज आणि चप्पल घालू नका.अनवाणी पायांनी स्वयंपाकघरात प्रवेश करा.
शनिवारी बूट आणि चप्पल दान करणे खूप शुभ मानले जाते. विशेषत: शनिवारी संध्याकाळी चामड्याचे बूट आणि चप्पल दान केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते.दुसऱ्या व्यक्तीची चप्पल स्वतः कधीही घालू नका. असे केल्याने तुम्ही गरिबीचे शिकार होऊ शकता.ज्योतिष शास्त्रानुसार सोमवारी आणि शुक्रवारी नवीन शूज आणि चप्पल घालणे शुभ मानले जाते. हे आपले नशीब जागृत करण्यास मदत करते.