Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२० वा जन्मोत्सव सोहळा, कणकवलीत २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

सर्व भक्तांच्या कल्याणार्थ पहिले चार दिवस 'परमहंस भालचंद्र महारुद्र स्वाहाकार' विधी होणार आहे. तसेच १२० दात्यांचे रक्तदान शिबिर होणार आहे. या उत्सवामुळे अवघी कनकनगरी भक्तीरसात न्हाऊन निघणार आहे

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 21, 2024 | 02:33 PM
योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२० वा जन्मोत्सव सोहळा, कणकवलीत २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
Follow Us
Close
Follow Us:

योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२० वा जन्मोत्सव सोहळा कणकवलीत २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम कणकवली दि.२१ जानेवारी(भगवान लोके) वात्सल्यमूर्ती, परमकृपाळू, योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२० वा जन्मोत्सव (Birth anniversary of Bhalchandra Maharaj) सोहळा कणकवलीत २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.  सर्व भक्तांच्या कल्याणार्थ पहिले चार दिवस ‘परमहंस भालचंद्र महारुद्र स्वाहाकार’ विधी होणार आहे. तसेच १२० दात्यांचे रक्तदान शिबिर होणार आहे. या उत्सवामुळे अवघी कनकनगरी भक्तीरसात न्हाऊन निघणार आहे.

[read_also content=”70 वर्षे काश्मीर जळत राहिलं’… ‘आर्टिकल 370’चा धमाकेदार टिझर रिलीज, अ‍ॅक्शन करताना दिसणार यामी गौतम! Navarashtra News Network Navarashtra News Network नवराष्ट्र.कॉम https://www.navarashtra.com/movies/article-370-teaser-released-yami-gautamvaibhav-tatvavadipriyamani-starer-movie-will-relased-on-23-february-nrps-500167.html”]

. २८ जानेवारी रोजी सकाळी १०.३० ते १२.३० श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. २८ जानेवारी ते बुधवार ३१ जानेवारी दरम्यान पहाटे ५.३० ते ८ काकड आरती, समाधीपूजा, अभिषेक, सकाळी ८ ते १२.३० सर्व भक्त कल्याणार्थ परमहंस भालचंद्र महाराज स्वाहाकार, दुपारी १२.३० ते ३ आरती व महाप्रसाद, दुपारी १ ते ४ भजने, सायंकाळी ४ ते ८ सांस्कृतिक कार्यक्रम व त्यानंतर आरती होणार आहे. बुधवारी ३१ रोजी सकाळी ९ ते १२ रक्तदान शिबिर होणार असून १२० दात्यांचा रक्तदान संकल्प आहे. गुरुवार १ फेब्रुवारी रोजी परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२० वा जन्मदिन आहे. यानिमित्त पहाटे ५.३० ते ८ काकड आरती, समाधीपूजा, जपानुष्ठान, सकाळी ८ ते ९ भजने, सकाळी ९ ते ११.३० समाधीस्थानी लघुरुद्र, सकाळी ११.३० ते १२ जन्मोत्सव कीर्तन (ह.भ.प. भाऊ नाईक, रा. वेतोरे), दुपारी १२ वाजता परमहंस भालचंद्र महाराज यांचा जन्म सोहळा, दुपारी १२.३० ते ३ आरती व महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची उंट, घोडे तसेच वारकरी सांप्रदाय समवेत शहरातून भव्य मिरवणूक व त्यानंतर आश्रमात आरती होणार आहे. रात्री १२वाजल्या नंतर श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचा पौराणिक ट्रिकसीनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग (व्यंकटेश पद्मावती) होणार आहे. या जन्मोत्सव सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे. विविध कार्यक्रम! २८ रोजी दुपारी ३.३० ते ६.३० कणकवली शाळा नं. ३ च्या मुलांचे विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ६.३० ते ७.३० आदर्श संगीत विद्यालयातील बबन कदम यांच्या विद्यार्थ्यांचे शास्त्रीय तबला वादन होणार आहे. सोमवार २९ रोजी सायंकाळी ४ ते ५ सुनील पाडगावकर (रा. मळगाव-सावंतवाडी) यांचा ‘हवा नवा तो सूर’ हा अभंग, नाट्य, भक्तीगीत हा कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी ५ ते ७.३० धर्मानंद नाईक (रा. धारगळ-पेडणे) यांचा ‘सूर निरागस हो’ कार्यक्रम होणार आहे. ३० रोजी सायंकाळी ४ ते ७.४५ ‘ययाती आणि देवयानी’ हे दोन अंकी संगीत नाटक होणार आहे. ३१ रोजी सायंकाळी ४ ते ७.४५ दशावतारी नाटक होणार आहे.

Web Title: 120th birth anniversary celebration of yogiraj paramhansa bhalchandra maharaj kankavli 28 january to 1 february nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2024 | 02:32 PM

Topics:  

  • Birth Anniversary

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.