
aditya thackeray
नाशिक : आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) शिवसंवाद यात्रेनिमित्त (Shivsanwad Yatra) नाशिकमध्ये दौरा (Aditya Thackeray Nashik Visit) सुरु आहे. त्यांनी काळाराम मंदिरात (Kalaram Temple) जाऊन काळारामाचे दर्शन घेतले आहे. तसेच विधिवत पूजा केली आहे. काळाराम मंदिरानंतर ते मनमाडकडे जाणार आहेत. मात्र आमदार कांदेंनी आव्हान दिल्यानंतर आदित्य ठाकरे मनमाडकडे जाणार का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
[read_also content=”ठाण्यात ‘मी एकनाथ शिंदे समर्थक’ राख्यांचा बोलबाला https://www.navarashtra.com/maharashtra/in-thane-i-support-eknath-shinde-rakhis-for-sale-nrps-306790.html”]
शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर बंडखोरांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा करणाऱ्या आदित्य ठाकरे यांना आज थेट बंडखोर आमदारांचाच सामना करावा लागू शकतो. कारण आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज मनमाडचे शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात आहे. त्याआधी ते नाशिक शहरातील काळाराम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. काळाराम मंदिर प्रशासनाकडून आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
आदित्य ठाकरेंना सुहास कांदे भेटणार होते. मात्र त्याआधी कांदे यांचा ताफा पिंपळगाव टोलनाक्यावर अडवला गेला आहे. कांदे आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाल्याची माहिती मिळाली आहे. नाशिकमधून आदित्य ठाकरे हे मनमाडकडे रवाना झाले आहेत.