
छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यात काळी जादू सुरु असल्याची अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वशीकरण आणि करणी करण्याच्या नावाखाली जिल्ह्यातील पाडळी खुर्द गावच्या हद्दीत अनेक मुलींच्या फोटोंवर हळद-कुंकू, टाचण्या टोचलेलेल लिंबू, त्यावर हिरवे कापड आणि इतर साहित्य आढळून आले आहे. घडल्या प्रकारामुळे गावातील मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोल्हापूर हा पुरोगामी आणि सांस्कृतीक वारसा लाभलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. कोल्हापूर जिल्ह्यातून समाजपरीवर्तनाची अनेक आंदोलने, चळवळी आणि संस्था उभ्या राहिल्या. त्यामुळे अशा जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली अशी विचित्र घटना पाहायला मिळावी याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
[read_also content=”मंडाळाच्या जागेवर गाडा लावण्यावरून दोन गटात वाद; कट रचून तरुणावर हल्ला https://www.navarashtra.com/maharashtra/argument-between-two-groups-over-placing-a-cart-on-the-mandal-site-conspiracy-to-attack-youth-nrdm-353787.html”]
घडल्या प्रकाराची गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे, तसेच गावकऱ्यांनी यावर रात्रभर गस्त घालण्याचा विचार करत आहेत. काही गावकऱ्यांनी तर ग्रामपंचायतद्वारे गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत अशीही मागणी केली आहे. गावकरी सीसीटीव्ही बसवण्यावरही विचार करत आहेत. गावातील मुलीचा सुरक्षेचा प्रश्न एैनीवर आला असून पालकांना त्यांची चिंता वाटत आहे.
घडल्या प्रकाराबद्दल गावकऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार देणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, अद्याप तरी पोलिसात तक्रार झाल्याचे वृत्त नाही. गावच्या लेकीबाळींचे घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. प्रशासनाने तरी दखल घेऊन याबाबत योग्य ती पावले टाकावीत आणि गावकऱ्यांना चिंतामुक्त करावे. हे असेच सुरु राहिल्यास गावकऱ्यांवर मानसिकदृष्ट्या मोठे संकट येईल अशी भावना गावातील सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.