Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akshaya Tritiya 2025: ‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणाऱ्या बालविवाहावर लक्ष, पोलिस विभाग राहणार सतर्क

अक्षय तृतीयेला मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असल्याचे आतापर्यत पुढे आले आहे. हेच बालविवाह रोखण्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मुहूर्तावर सामुदायिक व एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 29, 2025 | 05:57 PM
‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणाऱ्या बालविवाह लक्ष, पोलिस विभाग राहणार सतर्क (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणाऱ्या बालविवाह लक्ष, पोलिस विभाग राहणार सतर्क (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात बालविवाह कुप्रेथेचे संकट अजूनही कायम असून गेल्या सहा वर्षात 5421 बालविवाह थांबवण्यात आले आहे. या प्रकरणांमध्ये तब्बल 401 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लावण्यात येणारे बालविवाह रोखण्याचे आवाहन प्रशासनापुढे राहणार आहे. याचदरम्यान आता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर विवाह सोहळे आयोजित केले जात असून या मुहूर्तावर बालविवाह मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले आहे. निर्मल भवन येथे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बालविवाह रोखणेबाबत करावयाच्या कार्यवाही संबंधित बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर बोलत होत्या.

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेच्या रात्री करा हळूच झाडूचा उपाय, कायम राहील लक्ष्मीची कृपादृष्टी

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार १८ वर्षांखालील मुली आणि २१ वर्षांखालील मुलांचे विवाह करणे बेकायदेशीर आहे. परंतु आजही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होतांना दिसतात. त्यामुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी याबाबत कार्यपद्धती ठरवून काम करावे. गावपातळीवर ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, पोलीस प्रशासन, महिला व बाल विकास अधिकारी यांनी विशेष लक्ष ठेवून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

बालविवाह रोखणे ही केवळ शासनाची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी असल्याचे सांगून बाल विवाहाबाबत तक्रार आल्यास त्यावेळी सरपंच, पोलीस पाटील यांना देखील जबाबदार धरण्यात यावे. आदिवासी भागातही बालविवाहाचे प्रमाण अधिक असून त्या भागात कार्यरत अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवावी. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी दर तीन महिन्याला आढावा घ्यावा, असेही राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. परभणी जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक दिसून येते त्यामुळे तिथे विशेष मोहीम राबवण्यात यावी, अशी सूचनाही साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिली.

अक्षय्य तृतीयेला तयार होणार दुर्लभ राजयोग, या राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Web Title: Akshaya tritiya 2025 meghana bordikar on police department to remain on alert over child marriages on akshaya tritiya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 05:57 PM

Topics:  

  • Akshaya Tritiya

संबंधित बातम्या

बालविवाह बंदी कायद्याआडून बालविवाह सुरूच; कायद्याच्या भीतीने लग्न न करताच एकत्रित राहण्याकडे कल
1

बालविवाह बंदी कायद्याआडून बालविवाह सुरूच; कायद्याच्या भीतीने लग्न न करताच एकत्रित राहण्याकडे कल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.