बीड: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते शिंपोरा-खुंटेफळ पाइपलाइन आणि बोगदा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पण हा दौरा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला. बीडच्या कार्यक्रमात भाजप आमदार सुरेश धस, मंत्री पंकजा मुंडे यादेखील उपस्थित होत्या. सभेत भाषण करताना सुरेश धस यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. काही राजकारण्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठिंबा दिल्यामुळे बीड जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली असल्याचा सुरेश धस यांनी आरोप केला. त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
आपल्या भाषणात सुरेश धस म्हणाले, “बीड जिल्ह्याची बदनामी होत असल्याचे काहीजण म्हणतात. पण या जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटलांना निवडून दिले, धनगर समाजाचे रखमाजी पाटील गावडे, केशरकाकू क्षीरसागर, बबनराव ढाकणे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांसारखे नेतृत्व दिले. विशेषतः गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा थोर नेता या जिल्ह्याने घडवला.”
झुकेगा नहीं साला! रक्तबंबाळ शरीर अन् चिमुकला बनवतोय रील; अपघातात जखमी
धस म्हणाले, “या जिल्ह्याने अनेक कर्तबगार प्रशासकीय अधिकारी दिले,. राजेश कुमार, आनंद लिमये, सुनील केंद्रेकर, नवलकिशोर राम, तसेच पोलिस अधिकारी संतोष रस्तोगी आणि लखमी गौतम यांनी येथे काम केले. मात्र, काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठिंबा दिल्यामुळे जिल्ह्याची प्रतिमा आज कलंकित झाली आहे.” या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख प्रकरणावर आपली कणखर भूमिका आवडल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आभार मानत सुरेश धस यांनी म्हटले, “सरपंच संतोष देशमुख प्रकरणात जी कणखर भूमिका तुम्ही घेतली, ती सगळ्यांना आवडली. तुम्ही जे म्हटले की कुणालाही सोडणार नाही, त्यावर आमचा विश्वास आहे. मात्र, अजून राख, वाळू, भूमाफिया यांना मोक्का लागला पाहिजे, ही आमची विनंती आहे. तुम्ही तो लावाल, याबद्दल आम्हाला खात्री आहे,” असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘भारताच्या कोणत्याही उद्धटपणाला आम्ही…’ पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी केले आणखी एक
आपल्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना सुरेश धस म्हणाले, “फडणवीस साहेब, २०१९ पासून माझ्याविरोधात आणि माझ्या कुटुंबाविरोधात कट रचले गेले. वेगवेगळ्या पद्धतीने मला त्रास देण्याचा प्रयत्न झाला. मात्र तुम्ही माझ्या मागे देवासारखे उभे राहिलात. २०१९ मध्ये बहुमत मिळूनही तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात. जनादेश तुमच्या बाजूने होता. पण त्यानंतरही तुमच्याविरोधात राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा कट रचला गेला. मात्र तुम्ही कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला त्याला तोड नाही. तुम्ही त्या संकटावरही मात केली. त्याला बिनजोड पैलवान म्हणतात,” असं सुरेश धस यांनी सांगितलं.