धनंजय मुंडेंच्या आई शेतात राहायला का गेल्या? सुरेश धसांच्या टीकेनंतर मुंडेंचीच पोस्ट
बीड: मकोका अंतर्गत तुरुंगात असलेला वाल्मिक कराड प्रकरणामुळे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजीनामा देण्याबाबत दबाब अधिकच वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांची भेट घेण्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत. आज (29 जानेवारी) दुपारी 12 वाजता धनंजय मुंडे आणि केंद्रीय मंत्री यांच्यात बैठक होणार आहे.
या दौऱ्याचे एक विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आजपासून (29 जानेवारी) तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस दिल्लीला जात आहेत. मात्र, वाल्मिक कराड प्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकीय तणाव वाढल्यामुळे या दौऱ्यांना राजकीय अर्थ दिला जात आहे.
Chinese Lunar New Year’s Day : जाणून घ्या चीनमधील ‘या’ अत्यंत महत्त्वाच्या
सोमवारी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर, धनंजय मुंडे यांनी मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आता दिल्ली दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर कोणते निर्णय होणार, याबद्दल चर्चा सुरू आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून दीडशेहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये वाल्मिक कराड यांच्या पत्नी, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, तसेच सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची चौकशी समाविष्ट आहे.
सर्व गोष्टी वापरूनही दातांचा पिवळा थर तसाच राहतोय? साध्या उपायांनी मिळतील मोत्यासारखे
धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांच्यावर केज पोलीस ठाण्यात दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी करीत असून, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा सहभाग संशयित म्हणून एसआयटीच्या तपासाधीन आहे.
काय आहे प्रकरण?
बीड कारागृहात असलेल्या आरोपी वाल्मिक कराडवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले होते. वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे संबंधही संपूर्ण बीडमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. अशातच अंजली दमानिया यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचे वाल्मिक कराडशी असलेले व्यक्तिगत आणि आर्थिक संबंध याबाबतचे पुरावे अजित पवारांना सादर केले.
अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि बीडमधील त्याच्या दहशतीचे आणि दोघांच्या संबंधांचे पुरावेही दिले आहेत. त्यानंतर अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, असी विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. पण अजित पवार यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर मी सरन्यायाधीशांना पत्र लिहून यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंती करणार आहे, असंही दमानिया यांनी यावेळी सांगितलं.