सोलापूर – भारतीय जनता पक्षाचे सोलापूर ग्रामीण भागातील जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा मंगळवारी 12 जुलै रोजी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारला. भाजप शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांकडे जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार दिला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर आरोप करत एका महिलेने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच भाजप गटात मोठी खळबळ उडाली आहे.
७ जुलै रोजी सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी एका महिलेविरोधात आपल्याला हॅनीट्रॅपमध्ये अडकविल्याची तक्रार मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरूमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सर्व स्तरातून उमटलेल्या प्रतिक्रियांनंतर तातडीने देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
या व्हिडिओवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी श्रीकांत देशमुख यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. ”अरे सामान्य जनतेच्या नजरेत तुम्ही चांगलं समजले जाता. अशी कृत्य केली तर लोक काही दिवसानी तुम्हाला चप्पलांनी मारतील.” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.
देसाई म्हणाल्या, आज एक व्हिडिओ वायरल झाला आहे. भाजपचा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा हा व्हिडिओ आहे. हाच श्रीकांत देशमुख मुंबईत जातो. मला हनी ट्रॅप मध्ये अडकवले जाणार आहे, असे सांगतो. अरे हनी ट्रॅप मध्ये कोण अडकतो. जे अनैतिक संबंध ठेवतात. त्यांना हनी ट्रॅपची भीती असते. अरे सामान्य जनतेच्या नजरेत तुम्ही चांगलं समजले जात आहेत. अशी कृत्य केली तर लोक काही दिवसानी तुम्हाला चप्पलांनी मारतील.