• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Bjps Dance In Mumbai Should Not Bring Bad Luck In The Fight Against Corona Nrkk

‘मुंबईतील भाजपच्या नाच्यांनी कोरोना विरुध्दच्या लढाईत अपशकुन करू नये’

मुंबईत अद्ययावत कोविड सेंटर्स उभारून लोकांना सेवा दिली जात आहे. लोकांचे प्राण वाचविले जात आहेत. यावरही भाजपच्या काही नाचे मंडळींचा त्यावर आक्षेप असून ते जमिनीवर काठय़ा आपटून ‘साप साप’ म्हणून बोंबलत फिरत आहेत. या नाचे मंडळींना गाय दूध देते हे दिसत नाही, तर फक्त शेण दिसते. खरेतर आता गाईच्या शेणातूनही अनेक ‘उपचार’ पद्धती सुरू झाल्या आहेत व शेणापासून इतर अनेक उपयुक्त उपक्रम संघ परिवाराच्याच गोशाळेत सुरू केले आहेत, या टोणग्यांना हे समजणार कधी? समाजाला लागलेली ही कीड आहे. चांगले चाललेले बघवले न जाण्याची पोटदुखी आहे.

  • By Kaustubh Khatu
Updated On: Jan 11, 2022 | 07:53 AM
‘मुंबईतील भाजपच्या नाच्यांनी कोरोना विरुध्दच्या लढाईत अपशकुन करू नये’
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अमेरिकेसारख्या देशात कोरोनाचा विस्फोट होत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती नियंत्रणाखाली आहे. गंगेतील वाहत्या प्रवाहात कोरोनाग्रस्तांचे मृतदेह वाहताना जगाने पाहिले. गुजरातसारख्या राज्यात स्मशानात दोन दोन दिवस अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या होत्या. मुंबई-महाराष्ट्राने शर्थ करून असे विदारक चित्र घडू दिले नाही. सध्याचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवियाही उत्तम काम करीत आहेत. निदान मुंबईतील भाजपच्या नाच्यांनी त्यांना तरी अपशकून करू नये. असं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून राज्यातील भाजप नेत्यांवर निषाणा साधला आहे.

काय म्हटलंय सामनात?

राज्यात कडक निर्बंध लावले असले तरी धार्मिक स्थळे आणि दारूच्या दुकानांतील गर्दी वाढली आहे. ही गर्दी अशीच वाढत गेली तर धार्मिक स्थळे आणि दारूची दुकाने बंद करावी लागतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

राज्यात रोज ५० हजारांच्या आसपास कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत 1 लाख 80 हजार कोरोनाग्रस्त रुग्ण देशात सापडले, हे गंभीर असले तरी त्यातून बरे होणाऱयांचे प्रमाणही चांगले आहे. इस्पितळात जाण्यापेक्षा लोक घरच्या घरीच उपचार घेत आहेत. तज्ञांचे म्हणणे असे की, ज्या वेगाने संसर्ग वाढतोय त्याच वेगाने तो खाली कोसळणार. तरीही पुढच्या तीन महिन्यांत आरोग्यविषयक ताणतणाव वाढण्याची लक्षणे दिसत आहेत, म्हणूनच हिंदुस्थानचे पंतप्रधान मोदी यांनी देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

निर्बंधांबाबत काटेकोर राहावे असे त्यांनी सरकारी यंत्रणांना सुचवले, पण याची सुरुवात पंतप्रधानांनी स्वतःपासूनच केली पाहिजे. वेगवान लसीकरणावर जोर द्यावा, असे त्यांनी सांगितले. मग मधल्या काळात शंभर कोटी लोकांना लस देण्याचा जो उत्सव साजरा झाला तो नक्की काय होता? सरकारी यंत्रणांवर आज प्रचंड ताण आहे. त्यात कोणाशीही चर्चा न करता पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

निवडणुकांचा मोसम हा कोरोना वेगाने वाढविण्याचा कारखानाच ठरतो. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांबाबत म्हणूनच चिंता वाटते. महाराष्ट्रासारख्या राज्यात चारशेहून जास्त डॉक्टर कोरोनाग्रस्त झाले आहेत. हजारो पोलीस बेजार आहेत. मुंबईत रोज 20,000 लोकांना कोरोना होतोय. राज्यातला आकडा दुप्पट आहे.

या प्रमाणात देशात कोरोनाचा आकडा वाढत राहिला तर परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. राजशकट चालविणाऱ्या सर्व यंत्रणा कोरोनाच्या तापाने फणफणून घरात पडल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यात त्यांनी म्हणे देशाच्या जनतेला कळकळीचे आवाहन केले. ते म्हणतात, ‘‘झपाटय़ाने पसरणाऱ्या ओमायक्रोनच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी कायम सतर्क राहणे गरजेचे असून मास्कचा योग्य वापर व सामाजिक अंतर राखणे या गोष्टी आता आपल्या जगण्याचा एक भाग व्हायला हव्यात.’’ मोदी यांनी एकदम योग्य तेच सांगितले, पण हे सर्व तुमच्यापासून सुरू व्हायला हवे.

पुतीनपासून बायडेनपर्यंत अनेक जागतिक नेत्यांसोबतच्या बैठकीत हे सर्व नेते ‘मास्क’ लावूनच बसलेले दिसतात. एकमेव अपवाद फक्त आमच्या पंतप्रधानांचा. यापुढे आपल्याला कोरोनासोबत जगावे लागेल, असे भाकीत दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेच होते. कोरोनाशी लढाई हा वादाचा व मतभेदाचा विषय असू नये. केंद्र सरकार याबाबतीत ज्या उपाययोजना करू पाहत आहे त्यास राज्य सरकारांनी हातभार लावायला हवा.

केंद्र सरकारच्या उपाययोजनांत भ्रष्टाचार सुरू आहे, घोटाळे आहेत, असे आरोप महाराष्ट्रातून कोणी केले नाहीत. राजकारण करायचेच तर ते कोठेही करता येईल, पण महाराष्ट्राची ती नियत नाही. मुंबई-महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करीत आहे. मुंबईत अद्ययावत कोविड सेंटर्स उभारून लोकांना सेवा दिली जात आहे. लोकांचे प्राण वाचविले जात आहेत. यावरही भाजपच्या काही नाचे मंडळींचा त्यावर आक्षेप असून ते जमिनीवर काठय़ा आपटून ‘साप साप’ म्हणून बोंबलत फिरत आहेत.

या नाचे मंडळींना नवाब मलिक यांनी कडक उत्तर दिले आहे. या नाचे मंडळींना गाय दूध देते हे दिसत नाही, तर फक्त शेण दिसते. खरेतर आता गाईच्या शेणातूनही अनेक ‘उपचार’ पद्धती सुरू झाल्या आहेत व शेणापासून इतर अनेक उपयुक्त उपक्रम संघ परिवाराच्याच गोशाळेत सुरू केले आहेत, या टोणग्यांना हे समजणार कधी? समाजाला लागलेली ही कीड आहे. चांगले चाललेले बघवले न जाण्याची पोटदुखी आहे.

मुंबई-महाराष्ट्रात जे कार्य कोरोना महामारीशी लढण्याबाबत सुरू आहे ते देशात पहिल्या क्रमांकाचे आहे. तेव्हा उगाच जळफळाट करून खुसपटे काढण्यापेक्षा या सत्कार्याला हातभार लावून लोकांची सेवा करा. तेवढेच पुण्य पदरी पडेल, पण जे चांगले सुरू आहे त्यावर चिखलफेक करायची, यापेक्षा वेगळे उद्योग त्यांचे दिसत नाहीत. अमेरिकेसारख्या देशात कोरोनाचा विस्फोट होत आहे. आतापर्यंत तब्बल सहा कोटी नागरिक कोरोनाबाधित झाले असून आठ लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती नियंत्रणाखाली आहे.

गंगेतील वाहत्या प्रवाहात कोरोनाग्रस्तांचे मृतदेह वाहताना जगाने पाहिले. गुजरातसारख्या राज्यात स्मशानात दोन दोन दिवस अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या होत्या. मुंबई-महाराष्ट्राने शर्थ करून असे विदारक चित्र घडू दिले नाही. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोविडची लढाई राज्यांनी पुढे न्यावी. देशाला लाभलेले सध्याचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवियाही उत्तम काम करीत आहेत. निदान मुंबईतील भाजपच्या नाच्यांनी त्यांना तरी अपशकून करू नये.

Web Title: Bjps dance in mumbai should not bring bad luck in the fight against corona nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2022 | 07:53 AM

Topics:  

  • Saamana Editorial

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारतात होणाऱ्या T20 World Cup 2026 चे बिगुल वाजले! IND vs PAK लढत ‘या’ दिवशी, तर फायनलची तारीखही निश्चित

भारतात होणाऱ्या T20 World Cup 2026 चे बिगुल वाजले! IND vs PAK लढत ‘या’ दिवशी, तर फायनलची तारीखही निश्चित

Nov 25, 2025 | 08:04 PM
शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

Nov 25, 2025 | 08:00 PM
Secure Investment Plan: GRP गुंतवणुकीचा सुवर्णकाळ! GRP का आहे सर्वात स्मार्ट गुंतवणूक?

Secure Investment Plan: GRP गुंतवणुकीचा सुवर्णकाळ! GRP का आहे सर्वात स्मार्ट गुंतवणूक?

Nov 25, 2025 | 08:00 PM
ICC T20 World Cup 2026 :आगामी टी२० विश्वचषकात रोहित शर्माची एंट्री! जय शहाने ‘हिटमॅन’ वर सोपवली मोठी जबाबदारी

ICC T20 World Cup 2026 :आगामी टी२० विश्वचषकात रोहित शर्माची एंट्री! जय शहाने ‘हिटमॅन’ वर सोपवली मोठी जबाबदारी

Nov 25, 2025 | 07:55 PM
Tech Tips: स्मार्टफोन खरेदी करताच सर्वात आधी करा हे काम, वर्षानुवर्षे नव्यासारखा तुमचे डिव्हाईस… जाणून घ्या

Tech Tips: स्मार्टफोन खरेदी करताच सर्वात आधी करा हे काम, वर्षानुवर्षे नव्यासारखा तुमचे डिव्हाईस… जाणून घ्या

Nov 25, 2025 | 07:45 PM
Maharashtra Politics: मराठीच्या मुद्द्यावरून शिंदेंची ‘उबाठा’ सडकून टीका; म्हणाले, “…काही केलं नाही”

Maharashtra Politics: मराठीच्या मुद्द्यावरून शिंदेंची ‘उबाठा’ सडकून टीका; म्हणाले, “…काही केलं नाही”

Nov 25, 2025 | 07:40 PM
खवय्यांनो लक्ष द्या! Zomato-Swiggy चे खाणे महागणार? नवा लेबर कोड ठरू शकतो दरवाढीचे कारण

खवय्यांनो लक्ष द्या! Zomato-Swiggy चे खाणे महागणार? नवा लेबर कोड ठरू शकतो दरवाढीचे कारण

Nov 25, 2025 | 07:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Nov 25, 2025 | 01:25 PM
Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Nov 25, 2025 | 01:21 PM
Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Nov 25, 2025 | 01:17 PM
CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

Nov 25, 2025 | 01:12 PM
NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

Nov 25, 2025 | 01:07 PM
Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Nov 24, 2025 | 11:31 PM
Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Nov 24, 2025 | 11:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.