Buldhana DCC Bank Election
काही समीकरणे बदलू शकतील का? असे अनेकांना वाटत आहे. ‘सहकार पॅनल’ आठ जागा, ‘शेतकरी परिवर्तन पॅनल’ ७ जागा आणि स्वतंत्र उमेदवार ८ जागा, असे एकूण २३ उमेदवार दिसत असले तरी यापैकी दोन उमेदवारांनी माघार घेतली असल्याने खऱ्या अर्थाने २१ उमेदवारांतच लढत होत आहे. ७ जागांच्या माध्यमातून सहकार पॅनलपुढे आव्हान उभे करणाऱ्या ‘शेतकरी परिवर्तन पॅनल’ची या निवडणुकीत जोरदार चर्चा होत आहे. आपल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सहकार पॅनलकडून डावलल्याचा धक्का राष्ट्रवादीला नामांकन वापस घेण्याच्या मुदती अखेर बसला. पण, तात्काळ सावरत ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ आकाराला आणून सहकार पॅनललाच अनपेक्षित धक्काच दिला.
अल्पावधीतच शेतकरी परिवर्तनला जिल्ह्यातून समर्थन मिळाले तसेच राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने या पॅनलला बळ दिले. स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, पालकमंत्री मकरंद पाटील हे शेतकरी परिवर्तनच्या पाठिशी उभे राहिल्याने ‘सहकार पॅनल’ने धसका घेतला. बँकेचे मतदार आणि ठेवीदार यांना गृहित धरून निवडणुकीचे राजकारण करणाऱ्या ‘सहकार’ च्या, विरोधात पॅनल उभे राहिल्यानंतर धावपळ होताना दिसली. उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रचार चित्रफितीतून अजितदादांनी ३०० कोटीच्या सॉफ्ट लोनच्या माध्यमातून बुलढाणा जिल्हा बँकेला केलेल्या भरीव मदतीची आवर्जून आठवन करून देत, पक्षाला डावलल्याबद्दल खंत व्यक्त केली.
जिल्हा सहकारी बैंकेच्या उर्वरित ९ संचालक पदासाठी मेहकर येथे श्री शिवाजी विद्यालय मतदान केंद्रात एकूण १४१ पैकी १३९ मतदारांनी मतदान केले. मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली, जिल्हा सहकारी बैंकेच्या निवडणुकीत २१ पैकी १२ संचालक अविरोध निवडून आलेले असून, उर्वरित ९ संचालक पदासाठी रविवारी मतदान झाले. इतर सहकारी संस्था मतदार संप, इतर मागासवर्गीय मतदार संघ, कृषी पतपुरवठा संस्था संग्रामपूर व लोणार मतदार संघ, नागरी सहकारी बैंक मतदारसंघ, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ आणि महिलासाठी राखीव असलेल्या दोन जागांसाठी मतदान झाले, अनुसुचित जाती जमाती मतदार संघासाठी माजी आमदार संजय रायमुलकर मेहकर हे उमेदवार होते, त्यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, राजश्री प्रतापराव जाधव, बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी मतदान केले.
Buldhana News: मृद व जलसंधारण अधिकाऱ्यांची कार जप्त; पाझर तलाव भूसंपादनप्रकरणी कोर्टाची कारवाई






