महायुतीतल्याच मित्र पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आजतरी स्वतंत्र राजकीय चूल मांडली आहे. यामुळे पंढरपूर नगरपालिकेची आगामी निवडणूक अधिक चुरशीची होईल असे दिसत आहे.
अजित पवार आणि डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांची भेट झाली. त्यामध्ये मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये सामील होत असल्याचे पक्के झाले आहे.
अजित पवार हे सत्तेसाठी लाचार आहेत त्यामुळे सत्ता सोडून ते राहू शकत नसल्यानेच ते सत्तेतून बाहेर पडणार नाहीत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
“पक्षाने आम्हाला टाळलं, तर आम्ही सुद्धा टाळल्याशिवाय राहणार नाही!” असा थेट इशारा पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिला आहे.
निवडणुकांमध्ये जागा कशा वाढतील या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पञकारांशी बोलताना दिली. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे, अशी माहितीही भरणेंनी दिली.
Ajit Pawar and Amol Mitkari: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अमोल मिटकरी यांनाही नवीन जबाबदारी देण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुतीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात घड्याळाची टिकटिक वाढण्याची जबाबदारी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आपल्या समर्थ खांद्यावर पेलणार असल्याचे दिसते आहे
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागले. अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांनी कोरेगाव पार्कमध्ये केलेल्या व्यवहारावर तीव्र शब्दांत टीका केली.
बारामती नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी घेणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील तर अपक्ष नंदा बाभुळकर यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार शिवाजी पाटील यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये ते कमळ चिन्हावर निवडून आले असून, सध्या या मतदारसंघाचे…
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे आणि जितेंद्र ननावरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
पुण्यातील जमिनीच्या वादामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. विशेषतः विरोधी पक्ष महाविकास आघाडी (MVA) मध्ये फूट पडली आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की उद्धव ठाकरे पुढे काय करतील?
अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमेडीया होल्डिंग्स एलएलपी या कंपनीने मुंढवा येथील १७.५१ हेक्टर (सुमारे ४४ एकर) जमीन बेकायदा विकत घेतल्याचा आरोप आहे.
पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका महायुतीमधील घटक पक्ष हे स्वतंत्रपणे निवडणुक लढणार आहेत. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पारडे अधिक जड असल्याचे दिसत आहे.
अमेडिया कंपनीच्या प्रतिनिधींना हे खरेदी खत रद्द करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज केला आहे. मात्र, हे खरेदीखत करताना मुद्रांक शुल्कातून माफीचा दावा करुन ते नोंदविण्यात आले होते.